नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, दिल्लीतील एका मतदान केंद्राजवळ आपच्या एका कथित कार्यकर्त्याने काँग्रेस उमेदवार अलका लांबा यांच्याबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी केली. त्यामुळे संतापलेल्या लांबा यांनी या कार्यकर्त्यावर हात उगारला. या प्रकारामुळे पररिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे.
Delhi Election 2020 Live Updates : माझं अंतर्मन सांगतंय, भाजपाच दिल्ली जिंकणार! मनोज तिवारींचा दावा
दिल्ली विधानसभा : उपमुख्यमंत्री सिसोदियांनी पाठवली भाजप खासदाराला कायदेशीर नोटीस
Delhi Election: दिल्लीतील मतदारांना मोफत सेवा, कॅब कंपनीची सामाजिक बांधिलकीया प्रकारानंतर अलका लांबा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ''मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पोलींग बूथवर आले होते. त्याचवेळी तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मला अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली. त्याने उच्चारलेले शब्द मी सांगू शकत नाही. आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता एका महिलेला अर्वाच्च शिविगाळ करवत होता.