नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रिंगणात उतरलेल्या 672 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. जामिया मिलिया, जेएनयू व शाहीनबाग येथील सीएएविरोधी आंदोलन हे निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे बनले होते.
दिल्लीतील तयारीचा राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी आढावा घेतला. सायंकाळपासूनच मतदान केंद्रावर अधिकारी दाखल झाले होते. केंद्राचा परिसर सुरक्षा रक्षकांनी वेढला होता. काही ठिकाणी वाहतूकही वळविण्यात आली. ही निवडणूक आम आदमी पक्षासाठी अटीतटीची, भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेतृत्व कसोटी पाहणारी, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. निवडणूक प्रचारात स्थानिक ते राष्ट्रीय मुद्दे प्रचारात गाजले. अनेक आयाराम-गयारामही यंदा रिंगणात उतरले आहेत.
Live Updates -
दिल्ली विधानसभेसाठी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 52.95 टक्के मतदान
- संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दिल्लीत 42.70 टक्के मतदान
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी दुपारी 2 वाजेपर्यंत 28.14 टक्के मतदान.
- नवी दिल्ली - दुपारी 1 वाजेपर्यंत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 19.37 टक्के मतदान
- काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींच्या मुलाने पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क
- मल्ल सुशील कुमारने केलं मतदान
- दिल्लीतील एका मतदान केंद्राजवळ आपच्या एका कथित कार्यकर्त्याने काँग्रेस उमेदवार अलका लांबा यांच्याबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी केली. त्यामुळे संतापलेल्या लांबा यांनी या कार्यकर्त्यावर हात उगारला. या प्रकारामुळे पररिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे.
- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, आणि उत्तर प्रदेश काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मतदान केले. मात्र यावेळी सोनिया गांधी पहिल्यांदाच काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्याशिवाय मतदान केंद्रावर दिसल्या.
- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तसेच गोपाल राय व आतिशी (सर्व आप), भाजपाचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, विजेंदर गुप्ता आणि अरविंदरसिंह लवली, कृष्णा तीरथ, अलका लांबा हे महत्त्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
- माझं अंतर्मन सांगतंय, भाजपाच दिल्ली जिंकणार असा दावा भाजपाच्या मनोज तिवारी यांनी केला आहे.
- दिल्ली विधानसभा : उपमुख्यमंत्री सिसोदियांनी पाठवली भाजपा खासदाराला कायदेशीर नोटीस
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मतदान केलं आहे.
- अभिनेत्री तापसी पन्नूने परिवारासह मतदान केलं आहे.
- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
- काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मतदान केले आहे.
- दिल्ली विधानसभा निवडणूक आपसाठी अटीतटीची, भाजपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेतृत्व कसोटी पाहणारी, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे.
- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
- दिल्लीमध्या 110 वर्षीय आजीने मतदान केलं आहे.
- मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, मतदारांच्या मोठ्या रांगा
- मतदानासाठी मतदारांच्या मोठ्या रांगा
- दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी बजावला मतदानाचा हक्क
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल थोड्याच वेळात मतदान करणार
- मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड
- दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाला बाहेर पडा... विक्रमी मतदान होऊद्या... असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
- दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
- दिल्लीचे मुख्य निवडणूक आयुक्त रणबीर सिंह यांनी केलं मतदान
- 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
- 70 मतदारसंघांमध्ये 2688 मतदान केंद्रांची व्यवस्था आयोगाने केली आहे. यातील 516 मतदान केंद्रांना अतिसंवेदनशील श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस भाजपा आणि काँग्रेसचा ‘रोड शो’, तर आम आदमी पार्टीच्या ‘झाडू चलाओ यात्रा’ने गाजला. शेवटच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, बॉलीवूड स्टार खासदार सनी देओल, तर काँग्रेससाठी अभिनेता तसेच खासदार राज बब्बर यांनी ‘रोड शो’ व पदयात्रा केल्या.
- परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
- दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.