नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने वेगवेगळ्या राज्यांतील प्रमुख नेत्यांना त्यांच्या राज्यातील रहिवासी राहत असलेल्या भागात सभा घेण्याची जवाबदारी दिली आहे. केंद्रीय मंत्री आणि खासदार रावसाहेब दानवे हे सुद्धा दिल्लीतील विविध विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सभा आणि बैठका घेताना पाहायाला मिळत आहे.
गेल्या आठवड्याभरापासून दानवे दिल्लीत ठाण मांडून आहे. दिल्लीच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या सोबत ते सुद्धा प्रचाराच्या रिंगणात उतरले आहे. तर भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते विविध भागात जाऊन 'डोर टू डोर' मतदारांची भेट घेत आहे.
दानवे यांनी शुक्रवारी तिमारपूर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सुरेंद्र सिंग बट्टू यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठका आणि सभा घेतल्या. यावेळी त्यांनी आम आदमी पार्टीचे प्रमुख व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. केंद्रसरकारने दिल्लीच्या सरकारला कामे करू दिली नसल्याचे केजरीवाल खोटा आरोप करत असून, प्रत्यक्षात त्यांनी कामे केलीच नसल्याचा आरोप यावेळी दानवे यांनी केला.