शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

महाराष्ट्र-हरयाणामध्ये भाजपने षड्यंत्र रचून विजय मिळवला? अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 14:59 IST

Delhi Election 2025: दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल भाजपवर सातत्याने टीका करत आहेत.

Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत, राजधानीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे आपआपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहे, तर भाजप दिल्लीची सत्ता काबीज करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. निवडणूक जवळ आल्यामुळे आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. अशातच, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक यांनी भाजपवर टीका करताना मोठा दावा केला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसंदर्भात पोस्ट करताना केजरीवालांनी महाराष्ट्र आणि हरयाणा निवडणुकीचाही मुद्दा उपस्थित केला. केजरीवाल X वरील पोस्टमध्ये म्हणतात, "दिल्लीमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणावर लोकांची मते कापण्याचा प्रयत्न करताना रंगेहाथ पकडले  आहे. हजारो मतदारांची मते कापण्यासाठी भाजपने अर्ज दाखल केला आहे. लवकरच यावर मोठा खुलासा करणार आहे. या लोकांनी हरयाणा आणि महाराष्ट्राची निवडऊक अशीच जिंकली का? भाजपवालो मी तुमचा डाव दिल्लीत यशस्वी होऊ देणार नाही," अशी पोस्ट केजरीवालांनी केली.

दिल्लीची निवडणूक महत्वाचीअरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी स्थापन केल्यापासून सातत्याने दिल्लीत विजय मिळवत आहेत. 2020 च्या विधानसभा निवडणुकीतही अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने विधानसभेच्या 63 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला केवळ 7 जागांवर यश मिळवता आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र, त्यानंतर गेल्या पाच वर्षात अरविंद केजरीवालांसह पक्षातील काही नेत्यांवर मद्य घोटाळ्यासह इतर आरोप झाले आहेत. केजरीवालांसह अनेक नेत्यांना तुरुंगातही जावे लागली आहे. त्यामुळेच आता यंदाही निवडणूक खूप महत्वाची असणार आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये भाजपचा अनपेक्षित विजयअरविंद केजरीवाल यांच्या या पोस्टनंतर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने अनपेक्षित विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या नेतृत्वाखाली भाजपने काँग्रेसच्या बाजूने वातावरण असतानाही, मोठा विजय मिळवला. तसेच, महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या बाजूने असलेला मतप्रवाह आपल्याकडे आणण्यात यशस्वी झाले.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४