दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा पहिला एक तास आटोपला असून, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने राज्यात १० वर्षांपासून सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांचे सुरुवातीचे कल समोर आले असून, त्यात भाजपाने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडा पार केला आहे.
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने ४४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर मागच्या वेळी ६० हून अधिक जागा जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाची जबर पिछेहाट झाली असून, आप सध्या केवळ २५ जागांवर आघाडीवर आहे. तर मागच्या दोन निवडणुकांत एकही जागा न जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी खातं उघडण्याची संधी असून, एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे.
दरम्यान, एकीकडे भाजपा जोरदार मुसंडी मारत असताना, दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे अनेक बडे नेते पिछाडीवर पडल्याचे सुरुवातीच्या मतमोजणीमधून दिसत आहे. दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी ह्या कलांमध्ये कालकाजी विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर पडल्या आहेत. तिथे भाजपाचे नेते रमेश बिधुडी यांनी आघाडी घेतली आहेत.