नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उशीर झाल्याने सोमवारी (20 जानेवारी ) नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. आपने केजरीवालांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. सोमवारी रोड शोला सुरुवात झाली. आपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. तसेच घोषणाही सुरू होत्या. मात्र प्रचंड गर्दीमुळे केजरीवाल उमेदवारी अर्ज भरायला पोहचू शकले नाहीत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी 3 पर्यंतची वेळ होती. परंतु मुख्यमंत्री केजरीवाल जिल्हाधिकारी कार्यालयात उशिरा पोहोचल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे आता केजरीवाल यांना मंगळवारी (21 जानेवारी) अर्ज दाखल करावा लागणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने उशीर झाला. कार्यकर्त्यांना सोडून उमेदवारी अर्ज दाखल करणे योग्य नव्हते. यामुळे उमेदवारी अर्ज सोमवारी भरता आला नसल्याचं म्हटलं आहे.
केजरीवाल यांच्यासोबत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आपच्या नेत्या आतिशी आणि इतरही अनेक नेते, कार्यकर्ते रोड शोमध्ये मोठ्या संख्येने सामील झाले होते. केजरीवाल यांचे कुटुंबीय ही रोड शोमध्ये सहभागी झाले होते. 'अच्छे बिते पाच साल, लगे रहो केजरीवाल' या घोषणा रोड शो दरम्यान देण्यात येत होत्या. आपने एकाचवेळी 70 उमेदवार जाहीर केले होते. मात्र, भाजपाला मित्रपक्षांमुळे सर्व यादी जाहीर करता आली नव्हती. शिरोमणी अकाली दलाने सीएएवरून आवाज उठविता येत नसल्याने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेत भाजपाची साथ सोडली आहे. तर भाजपाला नितिशकुमार यांचा संजद आणि लोक जनशक्ती पक्षाचा पाठिंबा मिळाला असून हे दोन पक्ष तीन जागा लढविणार आहेत.
भाजपाने 17 जानेवारीला 57 उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात उमेदवार देण्यात आला नव्हता. सोमवारी रात्री उशिराने भाजपाने उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये केजरीवालांविरोधात सुनील यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाने उर्वरित 10 जागांवर तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना हरीनगर, नांगलोई जाटहून सुमनलता शौकीन, राजौरी गार्डनहून रमेश खन्ना, नवी दिल्लीहून सुनील यादव, शाहदराहून संजय गोयल, कृष्णानगरहून अनिल गोयल, महरौलीहून कुसुम खत्री, कालकाजीहून धर्मवीर सिंह आणि कस्तूरबानगरहून रविंद्र चौधरी यांना तिकीट देण्यात आले आहे. तर दिल्लीमध्ये युतीमुळे दोन जागा जदयूला देण्यात आल्या आहेत. यामध्ये संगम बिहार आणि बुराडी या जागा आहेत. तर एक जागा लोजपाला देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Video: मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; ट्वविटरवरील 'त्या' व्हिडीओमुळे संताप
आंध्र प्रदेशच्या आता तीन राजधान्या, देशातील पहिलाच प्रयोग
सूरतमधील रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग
Delhi Election : भाजपाला मोठा धक्का; शिवसेनेनंतर आणखी एका पक्षाने 21 वर्षांची साथ सोडली
शासकीय दस्तऐवजातही पाथरीच साईबाबांची जन्मभूमी असल्याची नोंद
अभिमानस्पद! ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या लेकींचा रोबोट जाणार अमेरिकेला