नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. बसपाच्या एका उमेदवाराला लाठ्या, काठ्यांनी मारहाण करण्यात आली आहे. शाहीन बाग, सीएएविरोधातील आंदोलनांमुळे ही निवडणूक आधीच तापलेली असताना भाजपाच्या उमेदवाराने थेट प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या आपच्याच कार्यालयात 'घुसखोरी' केली.
दिल्लीमध्ये भाजपा आणि आपमध्येच प्रमुख लढत पहायला मिळत आहे. प्रचारकाळात भाजपाने केलेल्या सर्व्हेमध्ये आपला कडवी टक्कर मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार सभा घेण्यास सुरूवात केली होती. याला योगी आदित्यनाथ यांचीही साथ मिळाली. या प्रचाराचा फायदा भाजपाला होताना दिसत आहे. भाजपाचा तसा सर्व्हे आहे.
आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी भाजपा विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही सोडत नसल्याचे दिसून आले. टिळकनगर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार तेजेन्द्रपाल सिंह बग्गा यांनी थेट आपचे कार्यालय गाठले.
दिल्ली बदलतेय! भाजपाच्या गोटात उत्साहाचे भरते; केजरीवाल तणावात
Delhi Election 2020 : केजरीवालांच्या कन्येनं विरोधकांना विचारला जाब, म्हणाली...
भाजपाच्या ट्विटरवर याबाबतचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये बग्गा आपच्या प्रचार कार्यालयातील कार्यकर्त्यांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. भाजपाचा उमेदवार मत मागण्यासाठी थेट विरोधी पक्षाच्या कार्यालयात आल्याने उपस्थित कार्यकर्त्यांचे चेहरेही पाहण्यालायक झाले आहेत.