आप की काँग्रेस, मुस्लीम मतदार कुणासोबत? एक्झिट पोलमधून समोर आला धक्कादायक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 07:55 IST2025-02-06T07:55:09+5:302025-02-06T07:55:58+5:30

Delhi Exit Poll 2025 : बहुतांश एक्झिटपोलमध्ये दिल्लीत भाजपचे सरकार येणार, असे भाकित करण्यात आले आहे. तर काहींमध्ये आपला पुन्हा संधी मिळणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतांची मोठी भूमिका असते, ती कुणाच्या पारड्यात जातात, यावरही बरेच गणित अवलंबून असते.

delhi election exit poll 2025 matrize report muslim voters once again shown supports to aap | आप की काँग्रेस, मुस्लीम मतदार कुणासोबत? एक्झिट पोलमधून समोर आला धक्कादायक अंदाज

आप की काँग्रेस, मुस्लीम मतदार कुणासोबत? एक्झिट पोलमधून समोर आला धक्कादायक अंदाज

Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर एक्झिटपोलही समोर आले आहेत. बहुतांश एक्झिटपोलमध्ये दिल्लीत भाजपचे सरकार येणार, असे भाकित करण्यात आले आहे. तर काहींमध्ये आपला पुन्हा संधी मिळणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतांची मोठी भूमिका असते, ती कुणाच्या पारड्यात जातात, यावरही बरेच गणित अवलंबून असते. 2025 च्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात करण्यात आलेल्या एक्झिट पोलमधून समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील मुस्लीम समाजाने पुन्हा एकदा आम आदमी पक्षावर विश्वास दर्शवला आहे. तर भाजपच्या पारड्यात काँग्रेसपेक्षाही अधिक मुस्लीम मते जाताना दिसत आहेत.

असा आहे मॅट्रिझचा अंदाज -
मॅट्रिझच्या सर्वेक्षणानुसार, या विधानसभा निवडणुकीत 'आप'ला ६७ टक्के मुस्लीम मते मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या पारड्यात ११ टक्के आणि काँग्रेसच्या पारड्यात ९ टक्के मुस्लीम मते जाण्याची शक्यता आहे. याशिवाय १३ टक्के मुस्लीम मते इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. यापूर्वी २०२० च्या विधानसभा निवडणुकीत 'आप'ला ८७ टक्के मुस्लीम मते मिळाली होत. अर्थात, आता मुस्लिम मते 'आप'कडून इतर पक्षांकडे जाताना दिसत आहेत. 

मुस्लीम बहुल भागातील मतदान -
सायंकाळी ५ वाजेपर्यंत दिल्लीत ५७.७० टक्के एवढे मतदान झाले. येथील मुस्लीम भागांचा विचार करता, चांदणी चौक येथे ५२.७६ टक्के, मतियामहल येथे ६१.४० टक्के, बल्लीमारन येथे ५९.५६ टक्के, ओखला येथे ५२.७७ टक्के, सीमापुरी येथे ६२.४७ टक्के, सीलमपूर येथे ६६.१४ टक्के, बाबरपूर येथे ५४.५१ टक्के, मुस्तफाबाद येथे ६६.६८ टक्के, करावलनगर येथे ६२.७४ टक्के तर जंगपुरा येथे ५५.२ टक्के मतदान झाले.

Web Title: delhi election exit poll 2025 matrize report muslim voters once again shown supports to aap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.