शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

दिल्लीत योगींची 'जादू' चालली, बुलडोझरसमोर केजरी'वॉल' 'ध्वस्त'! स्ट्राइक रेट बघून विरोधकही थक्क होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:15 IST

Delhi Election Result 2025 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतही जोरदार प्रचार केला. त्यांनी येथे सुमारे १४ विधानसभा जागांसाठी सभा घेतल्या होत्या...

Delhi Election Result 2025: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत, फायरब्रँड नेते आहेत. ते केवळ उत्तर प्रदेशच नव्हे, तर देशातील इतर राज्यांतही तेवढेच लोकप्रिय आहेत. याची प्रचिती अनेक निवडणुकांमधून आली आहे. मग ती महाराष्ट्र विधानसभा निवडणूक असो किंवा हरियाणा विधानसभा निवडणूक. मुख्यमंत्री योगींनी प्रचार केलेल्या बहुतेक जागा भाजपने जिंकल्या आहेत. आता यात आणखी एक नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे दिल्ली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतही जोरदार प्रचार केला. त्यांनी येथे सुमारे १४ विधानसभा जागांसाठी सभा घेतल्या. यांपैकी भाजपने ११ जागा जिंकल्या आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांत भारतीय जनता पक्ष दिल्लीत सरकार स्थापन करताना दिसत आहे.

योगींनी या मतदारसंघांमध्ये केला होता प्रचार -मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, मंगोलपुरी, जेजे कॉलनीतील शिव विहार, इंद्रपुरीतील बुद्ध नगर, किराडी, करोल बाग, जनकपुरी विधानसभा, घोंडा, शाहदरा, उत्तम नगर, द्वारका, बिजवासन, पालम, राजेंद्र नगर, पटपडगंज, सुलतानपूर आणि देवनगर येथे सभा घेतल्या. या रॅलींमध्ये मुख्यमंत्री योगी यांनी आम आदमी पक्षावर जोरदार निशाणा साधला होता.

या जागांवर मिळाला विजय - मंगोलपुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राजकुमार चौहान विजयी झाले. मुख्यमंत्री योगींनी प्रचार केल्या शिव विहार मधील संगम विहार विधानसभा मतदारसंघातून भाजपचे चंदन कुमार चौधरी विजयी झाले. जनकपुरी विधानसभा जागेवर भाजपचे उमेदवार आशिष सूद यांनी विजय मिळवला. घोंडा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अजय महावार विजयी झाले. शाहदरा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय गोयल विजयी झाले.

याशिवाय, उत्तम नगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पवन शर्मा विजयी झाले. द्वारका विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रद्युम्न राजपूत, बिजवासनमधून आपमधून भाजपमध्ये सामील झालेले कैलाश गेहलोत, पालम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कुलदीप सोलंकी, राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार उमंग बजाज, तसेच पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार रवींद्र सिंह नेगी विजयी झाले आहेत.

या जागांवर भाजपचा पराभव - मुख्यमंत्री योगींनी ज्या १४ जागांवर प्रचार केला, त्यांपैकी भाजपचा फक्त तीन जागांवरच पराभव झाला. यात सुलतानपूर, किराडी आणि करोल बाग विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाAAPआप