नवी दिल्ली - देशाच्या राजधानीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा राष्ट्रीय राजकारणात दबदबा वाढलेला आहे. विरोधी पक्षांच्या महत्त्वाच्या चेहऱ्यांमध्ये केजरीवाल यांचे स्थान बळकट होत आहे. त्यामुळे आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देणाऱ्यांमध्ये अरविंद केजरीवाल यांना महत्त्व प्राप्त होणार आहे.
राजकीय विश्लेषकांचे मते, राष्ट्रीय राजकारणात अरविंद केजरीवाल यांना प्रमुख विरोधी चेहरा म्हणून उभारण्यास आणखी काही काळ लागेल. सध्या अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ला निवडणूक आयोगाकडून प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता आहे. २०१७ मध्ये पंजाबमध्ये मुख्य विरोधी पक्ष म्हणून आपने ओळख निर्माण केली. मात्र 'आप'च्या राष्ट्रीय राजकारणाला गोवा विधानसभा आणि मागील दोन लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. या दोन्ही निवडणुकीत आपला अपयश आलं.
व्वा! पवारसाहेब काय लॉजिक आहे; राष्ट्रवादीच्या 'त्या' टीकेवर भाजपाने लगावला खोचक टोला
२०१४ मध्ये पंजाबमधील ४ लोकसभा जागा आपने जिंकल्या होत्या मात्र २०१९ मध्ये अवघी १ जागा 'आप'ला राखता आली. दिल्लीच्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत दोन्ही वेळा आपला नाकारलं होतं. केजरीवाल यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढवली होती. त्यावेळी ३ लाखांहून अधिक मतांनी त्यांचा पराभव झाला.
IASच्या तयारीसाठी गेला होता दिल्लीला, तिसऱ्यांदा बनला आपचा आमदार
२०१७ मध्ये दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाकडून आपचा पराभव करण्यात आला त्यानंतर आपने आपल्या रणनीतीमध्ये बदल करत दिल्लीच्या विकासावर भर देण्यास सुरुवात केली. जेएनयूचे प्राध्यापक संजय पांडे यांनी सांगितले की, सध्या दिल्लीचे निकाल पाहून राष्ट्रीय राजकारणात केजरीवाल प्रमुख नेते म्हणून पुढे येतील हे बोलणं कठीण आहे. कारण ही स्थानिक पातळीवरील निवडणूक आहे. राष्ट्रीय राजकारणात उभारण्यासाठी आपकडे सध्या ठोस विचार आणि आधार नाही असं ते म्हणाले.
अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
तसेच सामाजिक कार्यकर्ते जगदीप छोकर यांनी सांगितले की, आपला राष्ट्रीय राजकारणात येण्यासाठी खूप काही करावं लागेल. मागील लोकसभा निवडणुकीत आपने ४०० जागा लढवल्या होत्या. मात्र त्यांना कोणत्या लोकांना उमेदवार म्हणून उभं केले आहे याचा अंदाजही त्यांना आला नाही.दरम्यान, राष्ट्रीय राजकारणात सध्या नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी विरोधकांकडे सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, मायावती, अखिलेश यादव असे काही मोजकेच चेहरे नजरेसमोर येतात. मात्र दिल्लीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांचाही उल्लेख विरोधकांच्या यादीत प्रामुख्याने समाविष्ट होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पश्चिम बंगालमध्येही मिळणार मोफत वीज; महाराष्ट्रात अजित पवार नकारात्मक
'बजरंगबलीच्या कृपेनं जिंकलात, आता शाळा-मदरशांमध्ये हनुमान चालिसा शिकवा'
...म्हणून अरविंद केजरीवाल यांना कुटुंबीय म्हणायचे 'कृष्ण'
'आप'मधून बाहेर पडले... भाजपा, काँग्रेसकडून लढले... निवडणुकीत गडगडले!
'...मग काँग्रेसनं आपलं दुकान बंद करायचं का?'; दिल्लीतील 'भोपळ्या'वरून नेत्यांमध्ये जुंपली