नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी पटपडगंज विधानसभा मतदार संघातून विजय मिळविला आहे. या विधानसभा निवडणुकीत मनीष सिसोदिया यांनी भाजपाचे उमेदवार रविंदर सिंह नेगी यांचा पराभव केला. विजयी झाल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
मनीष सिसोदिया म्हणाले, "पुन्हा एकदा पटपडगंड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यामुळे खूप आनंदी आहे. भाजपाने द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्लीतील लोकांनी असे सरकार निवडले की, जे लोकांसाठी काम करत आहे." याचबरोबर, हा पटपडगंजच्या जनतेचा विजय आहे. अनेक जागांवर वेगवेगळ्या लढती झाल्या होत्या. जनतेने भाजपच्या या द्वेषाच्या राजकारणाला नकार दिला, असेही मनीष सिसिदिया यांनी सांगितले.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीनं मुसंडी मारली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकार येण्याची दाट शक्यता आहे. आम आदमी पार्टीने 63हून अधिक मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. तर भारतीय जनता पार्टी 7 जागांवर पुढे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत केजरीवाल सरकार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. तर काँग्रेसला या निवडणुकीत यश मिळवता आले नाही. सध्या काँग्रेसला एकाही मतदारसंघात आघाडी नाही. त्यामुळे यंदाही काँग्रेस भोपळा फोडण्याची शक्यता कमीच आहे.
महत्त्वाच्या बातम्या
किमान शब्दांत कमाल टीका; पुण्यात शरद पवारांकडून राज ठाकरेंचा समाचार
भाजपाने द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला - मनीष सिसोदिया
गोळी मारणाऱ्यांना 'झाडू'ने मारलं, निकालानंतर प्रकाश राजची सिंघम स्टाईल टीका
'दिल्लीच्या जनतेने भाजपाला नाकारलं; सीएए, एनआरसी, एनपीआरलाही नाकारतील'
भाजपाच्या पराभवाचा सिलसिला आता थांबेल असं वाटत नाही; शरद पवारांची चपराक