Delhi Election Result 2025: ट्विस्ट...! 70 पैकी 50 जागा कोण-कोण जिंकणार? असा आहे दिल्लीतील नेत्यांचा सीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 09:01 IST2025-02-08T09:01:14+5:302025-02-08T09:01:14+5:30
Delhi Election Result 2025: दरम्यान, काही तासांपूर्वीच आम आदमी पक्षाची एक अंतर्गत बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी त्यांच्या विश्लेषणाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अहवालाचा हवाला देत ५० जागा जिंकण्याचा दावा केला. एवढेच नाही तर, केवळ ७-८ जागांवर अटीतटीची लढ होईल, असे गोपाल राय यांनी म्हटले आहे.

Delhi Election Result 2025: ट्विस्ट...! 70 पैकी 50 जागा कोण-कोण जिंकणार? असा आहे दिल्लीतील नेत्यांचा सीन
Delhi Election Result : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे, एक्झिट पोल खरे ठरणार की आम आदमी पक्ष चमत्कार घडवून दिल्लीत पुनिहा एकदा चौथ्यांता सरकार स्थान करणार. दरम्यान, मतमोजणीपूर्वीपासूनच 50 च्या आकड्यावरून दिल्लीतीन नेतेमंडळीं आपापले गणित मांडत आहेत.
दरम्यान, काही तासांपूर्वीच आम आदमी पक्षाची एक अंतर्गत बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी त्यांच्या विश्लेषणाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अहवालाचा हवाला देत ५० जागा जिंकण्याचा दावा केला. एवढेच नाही तर, केवळ ७-८ जागांवर अटीतटीची लढ होईल, असे गोपाल राय यांनी म्हटले आहे. अर्थात आम आदमी पक्षाला ५० जागां मिळण्याचा पूर्ण विश्वास आहे.
काय सुरू आहे भाजपच्या गोटात? -
भाजपच्या बाबतीतही काहीशी अशीच स्थिती आहे. बहुतांश एक्झिट पोलने भाजपच्या बाजूने कौल देत मोठ्या विजयाचा दावा केला आहे. ही निवडणूक भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढली आहे. तर आपने अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
जर एक्झिट पोल खरे ठरले तर तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजप सरकार स्थापन होईल. दिल्ली निवडणुकीसाठी बुधवारी ६०.५४ टक्के मतदान झाले. दरम्यान, भाजप सुमारे ५० जागा जिंकेल, असा दावा भाजप दिल्ली युनिटचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनीही केला आहे. महत्वाचे म्हणजे, दिल्ली विधानसभेत एकूण ७० जागा आहेत. यांपैकी, भाजप आणि आप दोघेही ५०-५० जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. यामुळे प्रत्यक्षात ५० जागा कुणाला मिळतात, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
काँग्रेमध्ये काय सुरू आहे? -
काँग्रेसने मात्र या चर्चेपासून स्वतःला दूर ठेवले आहे. खरे तर, एक्झिट पोलचे निकाल हे काँग्रेससाठी मोठा धक्का आहेत. कारण गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. मात्र यावेळी काँग्रेसला काहीशा आशा होत्या. मात्र, एक्झिट पोलने त्याही धुसर केल्या. जर एक्झिट पोल खरे ठरले तर पक्षाला केवळ एक अथवा दोनच जागा मिळू शकतील.