दिल्लीत तिसरी बार केजरीवाल सरकार; हजारोंच्या उपस्थितीत शपथविधी संपन्न

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 12:00 PM2020-02-16T12:00:05+5:302020-02-16T18:08:21+5:30

नवी दिल्ली -   दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री  अरविंद केजरीवाल  यांच्यावर विश्वास ठेवला आहे. 2015 च्या ...

Delhi Election Results 2020 delhi cm arvind kejriwal oath ceremony live updates | दिल्लीत तिसरी बार केजरीवाल सरकार; हजारोंच्या उपस्थितीत शपथविधी संपन्न

दिल्लीत तिसरी बार केजरीवाल सरकार; हजारोंच्या उपस्थितीत शपथविधी संपन्न

Next

नवी दिल्ली -  दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे. 2015 च्या निकालाची पुनरावृत्ती करत आपच्या पारड्यात 62 जागा टाकल्या आहेत. तर भाजपाला 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीतही भोपळा फोडता आला नाही. भाजपला धूळ चारून दणदणीत विजय मिळविलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी आज (16 फेब्रुवारी) रामलीला मैदानावर झाला. दिल्लीतील सामान्य जनतेला या सोहळ्यासाठी खास आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न झाला.


 

LIVE

Get Latest Updates

01:12 PM

हम होंगे कामयाब - अरविंद केजरीवाल

01:07 PM

शपथविधी सोहळ्याला छोट्या मफलर मॅनची हजेरी, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी

01:02 PM

शपथविधी सोहळ्याला दिल्लीकरांची मोठ्या संख्येने हजेरी

01:02 PM

मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. परंतु, दुसऱ्या कार्यक्रमात व्यग्र असल्यानं ते येथे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी आशीर्वाद द्यावा ही अपेक्षा आहे.

01:00 PM

मी प्रत्येकासाठी काम करणार - अरविंद केजरीवाल

12:56 PM

हा माझा नव्हे, प्रत्येक दिल्लीकराचा विजय - अरविंद केजरीवाल

12:35 PM

अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला छोट्या मफलर मॅनची हजेरी

12:35 PM

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रामलीला मैदानात त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांनीही पदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली.

12:30 PM

नवी दिल्ली - राजेंद्र गौतम यांनी पदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. 

12:27 PM

हजारोंच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा

12:27 PM

इमरान हुसैन यांनी गोपनियतेची शपथ घेतली.

12:25 PM

नवी दिल्ली - गोपाल राय यांनी शपथ घेतली. 

12:25 PM

दिल्ली - कैलाश गेहलोत यांनी गोपनियतेची शपथ घेतली.

12:23 PM

सत्येंद्र जैन यांनी घेतली शपथ

12:22 PM

मनीष सिसोदिया यांनी घेतली गोपनियतेची शपथ

12:19 PM

अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

12:17 PM

नवी दिल्ली : केजरीवाल मंत्रिमंडळात गोपाल राय, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, कैलाश गेहलोत, राजेंद्र पाल गौतम, इमरान हुसैन यांचा समावेश

12:16 PM

विशेष 50 जणांमध्ये डॉक्टर, शिक्षक, बाईक अ‍ॅम्बुलेन्स राइडर्स, सफाई कर्मचारी, कन्स्ट्रक्शन वर्कर्स, बस मार्शल, ऑटो ड्रायव्हर, अग्निशमन दलाचे जवान यांचा समावेश आहे. विशेष पाहुण्यांची एका वेगळ्या व्यासपीठावर केजरीवाल यांच्यासोबत बसण्याची देखील आली आहे.

12:15 PM

दिल्लीचा कारभार करताना गेल्या पाच वर्षांमध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील 50 जणांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

12:15 PM

केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला अन्य राज्याचे मुख्यमंत्री किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं गेलेलं नाही.

12:14 PM

भाजपला धूळ चारून दणदणीत विजय मिळविलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी आज (16 फेब्रुवारी) रामलीला मैदानावर होत आहे.

12:12 PM

अरविंद केजरीवाल यांच्यासह सहा जण मंत्रिपदाची शपथ घेणार असून या शपथविधी सोहळ्याला 50 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

12:08 PM

केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असून, त्याचा भव्य सोहळा करण्याचे आपने ठरविले आहे. राजधानीत राहणारा आम आदमी म्हणजे सर्वसामान्यांना या सोहळ्यात सहभागी करून घेतले जाणार आहे. यशानंतर आपमध्ये उत्साह आहे.

12:07 PM

पंजाब : लुधियानातील वॅक्स म्यूझियममध्ये अरविंद केजरीवाल यांचा पुतळा

12:04 PM

अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, आज शपथ घेणार

12:04 PM

भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलन केजरीवाल यांनी रामलीला मैदानावर केले होते. त्यामुळे येथे आज शपथविधी सोहळा दिल्लीकरांच्या साक्षीने होणार आहे.

12:02 PM

रामलीला मैदानावर भव्य संख्येने सामान्य नागरिकांच्या उपस्थित हा सोहळा होणार आहे.

12:01 PM

नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

Web Title: Delhi Election Results 2020 delhi cm arvind kejriwal oath ceremony live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.