नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. आम आदमी पार्टी सध्या 53 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत बहुमताच्या जोरावर आम आदमी पार्टीचेच सरकार येणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. भाजपा 16 जागांवर पुढे असून, काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार आम आदमी पार्टी दिल्लीत सरकार स्थापन करणार असल्याचं जवळपास ठरलेलं असून, केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होताना दिसत आहेत.विजयानंतरच्या सेलिब्रेशनचीही आम आदमी पार्टीनं तयारी पूर्ण केलेली आहे. रोड शो करण्यासाठी आम आदमी पार्टीनं एका जीपला सजवलं आहे. दिल्लीतल्या सुरुवातीच्या कलांनुसार आम आदमी पार्टीचे अमानतुल्लाह खान, मनीष सिसोदिया, अरविंद केजरीवाल हे प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा पुढे आहेत. तर काँग्रेसचे अरविंदर सिंह लवली हे पिछाडीवर आहेत. आम आदमी कार्यकर्त्यांनी पूर्ण कार्यालय फुग्यांनी सजवलं आहे. निकालानंतर अरविंद केजरीवालांबरोबरआपचे मोठे नेतेसुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीनं 70पैकी 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाच्या पारड्यात तीन जागा पडल्या होत्या. काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. दुसरीकडे भाजपाचे दिल्लीतले प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी आमचाच विजय होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे. मी आता उदास नाही. भाजपासाठी हा चांगला दिवस ठरेल, अशी मला आशा आहे. आम्ही आज दिल्लीत सत्तेत येणार आहोत. आम्ही जर 55 जागा जिंकलो तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. तत्पूर्वीही मनोज तिवारी यांनी ट्विट करत 48 जागा जिंकण्याचा दावा केला होता.
Delhi Election Results : 'आम्ही दिल्लीत सत्तेत येणार, 55 जागा जिंकणार', भाजपा नेत्याचा दावाDelhi Election Result : निकालापूर्वीच भाजपानं स्वीकारला पराभव?, कार्यालयात लागले पोस्टर
हनुमान मंदिरात पोहोचले भाजपा नेते विजय गोयलमतमोजणीपूर्वीच भाजपा नेते आणि राज्यसभा सदस्य विजय गोयल कनॉट प्लेसच्या हनुमान मंदिरात गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात दिल्लीत भाजपाचं सरकार येईल, असा दावाच विजय गोयल यांनी केला आहे. भाजपा आपल्या ताकदीवर बहुमत मिळवेल, अशी आशाही गोयल यांनी व्यक्त केली आहे.