नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टीनं ६० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत पुन्हा एकदा दणदणीत विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. सध्या आप ६३ जागांवर आघाडीवर असून भाजपा ७ मतदारसंघांत पुढे आहे. सलग दोन निवडणुकांमध्ये ६० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा करिश्मा आपनं करुन दाखवला आहे. आपचे राघव चढ्ढा यांनी राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघातून जवळपास २० हजार मतांनी विजय मिळवला आहे. ३१ वर्षांच्या चढ्ढा यांच्यासमोर भाजपाच्या आर. पी. सिंह यांचं आव्हान होतं. मात्र सुरुवातीपासून चढ्ढा यांनी आघाडी घेतली. अखेरपर्यंत त्यांनी ही आघाडी टिकवत दणदणीत विजय संपादन केला. राघव चढ्ढा यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली होती. तर सिंह २०१३, २०१५ मध्येही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते.
Delhi Election Results: लग्नाच्या मागण्यांनंतर मतांचा पाऊस; आपचा 'मोस्ट सुटेबल बॅचलर' विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 4:56 PM