नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल पाहता आपने जोरदार मुसंडी मारत तब्बल 53 जागांवर आघाडी घेतली आहे. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा केजरीवाल सरकार सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट संकेत एक्झिट पोलमधून मिळाले आहेत. आठ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपने तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ तीन जागा जिंकण्यात यश मिळालं होतं. आपचा विजय निश्चिच असल्याची प्रतिक्रिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे.
दिल्ली निवडणूक निकालांमध्ये आपचा विजय झाला तर दिल्लीमध्ये त्यांचं सलग तिसऱ्यांदा सरकार बनणार आहे. दिल्लीकरांसाठी 5 वर्षे कामं केल्यामुळे आपचा विजय निश्चित असल्याचं मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे. 'दिल्लीत विजय होणार याबाबत आम्हाला आत्मविश्वास आहे. कारण गेल्या पाच वर्षात आम्ही इथल्या लोकांसाठी काम केली आहेत' असं त्यांनी म्हटलं आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तसेच गोपाल राय व आतिशी (सर्व आप), भाजपाचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, विजेंदर गुप्ता आणि अरविंदरसिंह लवली, कृष्णा तीरथ, अलका लांबा हे महत्त्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीनं मुसंडी मारली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकार येण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्ष कार्यकर्त्यांना महत्त्वाची सूचना दिली. निवडणूक विजयानंतर फटाके फोडू नका, असं आवाहन केजरीवालांनी केलं आहे. दिल्लीतलं प्रदूषण वाढू नये, यासाठी केजरीवालांनी आपच्या कार्यकर्त्यांना ही सूचना केली आहे.
दिल्लीत पुन्हा एकदा आपचं सरकार येणार असल्याचा विश्वास असल्यानं पक्षाच्या कार्यकर्त्यांना विजयोत्सव साजरा करण्याची तयारी केली आहे. आपच्या मुख्यालयातून मिठाईची ऑर्डर देण्यात आली आहे. सर्वच एक्झिट पोल्सनी दिल्लीत आपचंच सरकार कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच आपनं मोठी मुसंडी मारली. दिल्लीतआपच्या झाडूची जादू कायम राहणार की भाजपाचं कमळ फुलणार, याचा फैसला आज होणार आहे.
दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ तीन जागा जिंकण्यात यश मिळालं होतं. दिल्लीतली आपची सत्ता कायम राहील, असा अंदाज सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागा वाढण्याची शक्यता आहे.
जामिया मिलिया, जेएनयू व शाहीनबाग येथील सीएएविरोधी आंदोलन हे निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे बनले होते. ही निवडणूक आम आदमी पक्षासाठी अटीतटीची, भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेतृत्व कसोटी पाहणारी, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. निवडणूक प्रचारात स्थानिक ते राष्ट्रीय मुद्दे प्रचारात गाजले. अनेक आयाराम-गयारामही यंदा रिंगणात उतरले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करण्याची कुठलीही संधी सोडली नाही. आरोप-प्रत्यारोपांच्या या मालिकेत मतदारांना आकर्षित करण्यासाठीही सर्वच पक्षांनी आतोनात प्रयत्न केले.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Election Results Live: आप सत्ता राखणार, हॅट्ट्रिकही मारणार; पण...
Delhi Election Results : व्हॅलेंटाईन डे अन् केजरीवालांचं नातं खास; याच दिवशी दोनदा घडवला इतिहास
Delhi Election Result 2020 : दिल्लीतील दहा 'हॉट सीट'; जाणून घ्या कोण पुढे, कोण मागे?
Delhi Election Result 2020: निकालापूर्वीच भाजपानं स्वीकारला पराभव?, कार्यालयात लागले पोस्टर