नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला अन्य राज्याचे मुख्यमंत्री किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं जाणार नाही. दिल्लीतील सामान्य जनतेला या सोहळ्यासाठी खास आमंत्रित करण्यात येणार असून त्यांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न होणार आहे. आपचे नेते गोपाळ राय यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच 'दिल्लीकरांनो... तुमचा मुलगा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहे. तुमच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी जरूर या' असं निमंत्रण अरविंद केजरीवाल यांनी सर्वसामान्य दिल्लीकरांना ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करून केलं आहे.
'जेव्हा भारतमातेच्या प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळेल. भारताच्या प्रत्येक नागरिकाला चांगले उपचार मिळतील. सुरक्षा व सन्मान महिलांमध्ये आत्मसन्मान निर्माण करेल. युवकांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांनी त्यांच्या घामाचे मूल्य मिळेल. प्रत्येक भारतीयाला मुलभूत सुविधा मिळतील. धर्म, जात सोडून प्रत्येक भारतवासी भारताला पुढे घेऊन जाईल तेव्हाच अमर तिरंगा आकाशात अभिमानाने फडकेल. तुमचा मुलगा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहे. त्याला आशीर्वाद देण्यासाठी रामलीला मैदानावर सकाळी सहा वाजेपर्यंत जरुर या' असं निमंत्रण केजरीवालांनी व्हिडीओतून दिलं आहे.
रामलीला मैदानावर भव्य संख्येने सामान्य नागरिकांच्या उपस्थित हा सोहळा होणार आहे. दिल्लीतील जनतेने आपला विजय मिळवून दिला. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करता येईल. हा सोहळा सर्वांसाठी खुला राहणार असल्याची माहिती गोपळ राय यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपने या सोहण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे. 2015 च्या निकालाची पुनरावृत्ती करत आपच्या पारड्यात 62 जागा टाकल्या आहेत. तर भाजपाला 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
दिल्लीत भाजपाला धूळ चारून दणदणीत विजय मिळविलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी रविवारी रामलीला मैदानावर होणार आहे. आप आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून केजरीवाल यांची एकमताने निवड करण्यात आली. केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असून, त्याचा भव्य सोहळा करण्याचे आपने ठरविले आहे. राजधानीत राहणारा आम आदमी म्हणजे सर्वसामान्यांना या सोहळ्यात सहभागी करून घेतले जाणार आहे. यशानंतर आपमध्ये उत्साह आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलन केजरीवाल यांनी याच मैदानावर केले होते. त्यामुळे तिथे शपथविधी सोहळा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मोदीजी, तुमचं गिफ्ट घेऊन जा; व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं शाहीन बागेची पंतप्रधानांना साद
उमेदवारी देताय? आधी गुन्ह्यांचे तपशील जाहीर करा!
निर्भया : चौघांचे नवे ‘डेथ वॉरन्ट’ पुन्हा लांबणीवर