Delhi Election Results : 'आम्ही दिल्लीत सत्तेत येणार, 55 जागा जिंकणार', भाजपा नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 09:09 AM2020-02-11T09:09:18+5:302020-02-11T09:16:56+5:30
Delhi Assembly Election Results 2020 Updates : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतमोजणीला मंगळवारी (11 फेब्रुवारी) सकाळी सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तसेच गोपाल राय व आतिशी (सर्व आप), भाजपाचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, विजेंदर गुप्ता आणि अरविंदरसिंह लवली, कृष्णा तीरथ, अलका लांबा हे महत्त्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपाचेदिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी भाजपा बहुमताने सत्तेत येईल आणि 55 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
मनोज तिवारी यांनी 'मी या निकालाबाबत आजिबात चिंताग्रस्त नाही. आजचा दिवस भाजपासाठी चांगला असेल असा मला विश्वास आहे. आज आम्ही दिल्लीत सत्तेत येणार आहोत. भाजपाने 55 जागा जिंकल्यास आश्चर्य वाटायला नको' असं म्हटलं आहे. मतमोजणी पूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
Manoj Tiwari, BJP Delhi Chief: I am not nervous. I am confident that it will be a good day for BJP. We are coming to power in Delhi today. Don't be surprised if we win 55 seats. #DelhiResultspic.twitter.com/3xPHnd6qNf
— ANI (@ANI) February 11, 2020
जामिया मिलिया, जेएनयू व शाहीनबाग येथील सीएएविरोधी आंदोलन हे निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे बनले होते. ही निवडणूक आम आदमी पक्षासाठी अटीतटीची, भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेतृत्व कसोटी पाहणारी, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. निवडणूक प्रचारात स्थानिक ते राष्ट्रीय मुद्दे प्रचारात गाजले. अनेक आयाराम-गयारामही यंदा रिंगणात उतरले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करण्याची कुठलीही संधी सोडली नाही. आरोप-प्रत्यारोपांच्या या मालिकेत मतदारांना आकर्षित करण्यासाठीही सर्वच पक्षांनी आतोनात प्रयत्न केले.
Delhi Election Results Live: सुरुवातीच्या कलांमध्ये आप सुस्साट; ५५ जागांवर मुसंडी #DelhiResults#DelhiElections2020#DelhiResultsOnLokmathttps://t.co/ZronSRrkYv
— Lokmat (@MiLOKMAT) February 11, 2020
दिल्लीत आपच्या झाडूची जादू कायम राहणार की भाजपाचं कमळ फुलणार, याचा फैसला आज होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ तीन जागा जिंकण्यात यश मिळालं होतं. दिल्लीतली आपची सत्ता कायम राहील, असा अंदाज सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागा वाढण्याची शक्यता आहे.
Delhi Election Result 2020: निकालापूर्वीच भाजपानं स्वीकारला पराभव?, कार्यालयात लागले पोस्टर #bjp#AAPWinningDelhihttps://t.co/mv9GshCigY
— Lokmat (@MiLOKMAT) February 11, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Election Results Live: भाजपापेक्षा 'आप' तिपटीने पुढे; काँग्रेसचा 'चंचूप्रवेश'
Delhi Election Result 2020: निकालापूर्वीच भाजपानं स्वीकारला पराभव?, कार्यालयात लागले पोस्टर
IND vs NZ 3rd ODI Live Score: भारताला तिसरा धक्का; पृथ्वी शॉ माघारी
‘मी येते गं आई’ म्हणून घराबाहेर पडलेली ‘ती’ परतलीच नाही...