नवी दिल्ली - भाजपला धूळ चारून दणदणीत विजय मिळविलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी आज (16 फेब्रुवारी) रामलीला मैदानावर होणार आहे. केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला अन्य राज्याचे मुख्यमंत्री किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं गेलेलं नाही. दिल्लीतील सामान्य जनतेला या सोहळ्यासाठी खास आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न होणार आहे. केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असून, त्याचा भव्य सोहळा करण्याचे आपने ठरविले आहे. राजधानीत राहणारा आम आदमी म्हणजे सर्वसामान्यांना या सोहळ्यात सहभागी करून घेतले जाणार आहे. यशानंतर आपमध्ये उत्साह आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यासह सहा जण मंत्रिपदाची शपथ घेणार असून या शपथविधी सोहळ्याला 50 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. दिल्लीचा कारभार करताना गेल्या पाच वर्षांमध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील 50 जणांना आमंत्रित करण्यात आलं आहे. विशेष 50 जणांमध्ये डॉक्टर, शिक्षक, बाईक अॅम्बुलेन्स राइडर्स, सफाई कर्मचारी, कन्स्ट्रक्शन वर्कर्स, बस मार्शल, ऑटो ड्रायव्हर, अग्निशमन दलाचे जवान यांचा समावेश आहे. विशेष पाहुण्यांची एका वेगळ्या व्यासपीठावर केजरीवाल यांच्यासोबत बसण्याची देखील आली आहे.
मन्नी देवी, शबीना नाज, लाजवंती, सुंदरलाल, गजराज सिंह, डॉ. बृजेश कुमार, निधि गुप्ता, विजय सागर, मुरारी झा, चरण सिंह, अजीत कुमार, प्रिजिथ रेख, नजमा, सुमित नागल, लक्ष्मीकांत शर्मा, दलबीर सिंह यांच्यासह 50 विशेष पाहुण्यांना केजरीवाल यांच्या शपथविधी सोहण्यासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे. 2015 च्या निकालाची पुनरावृत्ती करत आपच्या पारड्यात 62 जागा टाकल्या आहेत. तर भाजपाला 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीतही भोपळा फोडता आला नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलन केजरीवाल यांनी रामलीला मैदानावर केले होते. त्यामुळे येथे आज शपथविधी सोहळा दिल्लीकरांच्या साक्षीने होणार आहे.
'दिल्लीकरांनो... तुमचा मुलगा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहे. तुमच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी जरूर या' असं निमंत्रण अरविंद केजरीवाल यांनी सर्वसामान्य दिल्लीकरांना ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करून केलं आहे. 'जेव्हा भारतमातेच्या प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळेल. भारताच्या प्रत्येक नागरिकाला चांगले उपचार मिळतील. सुरक्षा व सन्मान महिलांमध्ये आत्मसन्मान निर्माण करेल. युवकांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांनी त्यांच्या घामाचे मूल्य मिळेल. प्रत्येक भारतीयाला मुलभूत सुविधा मिळतील. धर्म, जात सोडून प्रत्येक भारतवासी भारताला पुढे घेऊन जाईल तेव्हाच अमर तिरंगा आकाशात अभिमानाने फडकेल. तुमचा मुलगा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहे. त्याला आशीर्वाद देण्यासाठी रामलीला मैदानावर सकाळी सहा वाजेपर्यंत जरुर या' असं निमंत्रण केजरीवालांनी व्हिडीओतून दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Election Results : अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, आज शपथ घेणार
China Coronavirus : जगभरात ६७ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग; तब्बल १६०० बळी
'मतभेदांना देशविरोधी ठरवणं हा लोकशाहीवरील हल्ला'
राज्यात लवकरच शेतीसाठी पाणी महागणार, उद्योजकांनाही फटका
दूरसंचार कंपन्यांमुळे बँकांपुढेही संकट