नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागांपैंकी ६२ जागांवर विजय मिळवत आम आदमी पार्टीने (आप) पुन्हा एकदा सत्ता राखली आहे. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचे वर्णन आम आदमी पार्टीचे 'सबकुछ' असे स्थानिक नेते करतात. मात्र, या निवडणुकीतील विजयाचे श्रेय अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्यासोबत काम करणाऱ्या गुप्त टीमलाही जाते.
'ही' आहे केजरीवालांची गुप्त टीम...
पृथ्वी रेड्डी
बंगळुरूमधील व्यावसायिक पृथ्वी रेड्डी 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' आंदोलनादरम्यान कोअर कमिटीमध्ये होते. आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासून सदस्य असलेल्या पृथ्वी रेड्डी यांची पार्टीसाठी क्राउड फंडिंगवर नजर होती. तसेच, कार्यकर्त्यांची टीम सुद्धा ते लीड करत होते. निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांच्या मदतीने पथनाट्य, फ्लॅश मॉब, म्युझिकल वॉकच्या माध्यमातून पृथ्वी रेड्डी यांनी पार्टीचा प्रचार केला.
प्रीती शर्मा मेनन
प्रीती शर्मा मेनन या आम आदमी पार्टीची राष्ट्रीय कार्यकारी सदस्य आणि राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत. मुंबईच्या प्रीती यांनी पार्टीच्या अनेक जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. मग, ते देशाबाहेर विंग तयार करणे, निधी जमा करणे किंवा सोशल मीडिया सांभाळणे. प्रीती यांनी 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' आंदोलनासोबत आम आदमी पार्टीसाठी काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी अनेक वरिष्ठ नेत्यांचा व कॉन्ट्रॅक्टर्सचा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता.
कपिल भारद्वाज
आम आदमी पार्टीसाठी कपिल भारद्वाज हे अनेक वर्षांपासून पार्टी ऑपरेशन, मीडिया, पीआर, पल्बिसिटी यावर काम करत आहेत. निवडणूक मॅनेजमेंटपासून त्यांनी दिल्लीशिवाय राष्ट्रीय स्तरावर सुद्धा पार्टी मजबूत करण्यासाठी काम केले आहे. यूएसमधून पदवी घेतलेल्या कपिल भारद्वाज यांनी निवडणुकीत बुथ मॅनेजमेंट, स्टार कॅम्पेनर्सच्या शेड्युलवर काम करण्यापासून ते विविध विरोधी पक्षांच्या हालचालीवर नजर ठेवली होती.
जास्मीन शाह
निवडणुकीदरम्यान मीडियासंबंधीत मुद्द्यांशिवाय जास्मीन शाह हे मेनिफेस्टो कमिटीचे सदस्य राहिले आहेत. तसेच, जास्मीन शाह आम आदमी पार्टी सरकाच्या डायलॉग अँड डेव्हलपमेंट कमिशनचे व्हाइस चेअरपर्सन सुद्धा आहेत. त्यांनी सरकारच्या अनेक पॉलिसींचे डिझाइन केले आहे. आयआयटी मद्रासमधून बीटेक-एमटेकची डिग्री घेतल्यानंतर त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून डिग्री घेतली. यानंतर 12 वर्षे एका खाजगी कंपनीत काम केल्यानंतर ते 2016 मध्ये आम आदमी पार्टीत सहभागी झाले.
हितेश परदेशी
डिजिटल कंटेंट इंडस्ट्रीचे हितेश परदेशी यांनी समाजासाठी काहीतरी करण्याचा विचार केला. त्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीसाठी डिजिटल कॅम्पेन सुरु केले. हितेश यांच्या हटके कंटेंटने पार्टीचे कॅम्पेन चांगले झाले. निवडणुकीवेळी त्यांनी सुरु केलेले कॅम्पेन जास्तच आवडले. त्यांनी आयडिया देण्यासोबत कंटेंट रायटिंगपासून एडिटिंगवर काम केले. हिते परदेशी याआधी एआयबीमध्ये मीम्स तयार करत होते आणि फिल्टर कॉपीमध्ये मीडिया टीमचे प्रमुख होते.
आश्वती मुरलीधरन
2009मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आरटीआय आंदोलनात भाग घेतलेत्या आश्वती मुरलीधरन यांचा 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' आंदोलनात सुद्धा समावेश होता. निवडणुकीदरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या टाउनहॉल प्रोग्राम त्यांनी संपूर्ण मॅनेजमेंटसोबत केला. गेल्या दोन निवडणुकांसोबत यंदाही आश्वती मुरलीधनर यांनी वॉलंटियर मॅनेजमेंटसोबत जनसभांवर लक्ष ठेवले होते.