Delhi Election Results : 'दिल्लीच्या जनतेने भाजपाला नाकारलं; सीएए, एनआरसी, एनपीआरलाही नाकारतील'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 03:24 PM2020-02-11T15:24:55+5:302020-02-11T15:46:30+5:30

Delhi Assembly Election 2020 Results Updates: आपने 60 हून अधिक मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत केजरीवाल सरकार हे जवळपास स्पष्ट झालं आहे.

Delhi Election Results Mamata Banerjee congratulates Arvind Kejriwal | Delhi Election Results : 'दिल्लीच्या जनतेने भाजपाला नाकारलं; सीएए, एनआरसी, एनपीआरलाही नाकारतील'

Delhi Election Results : 'दिल्लीच्या जनतेने भाजपाला नाकारलं; सीएए, एनआरसी, एनपीआरलाही नाकारतील'

googlenewsNext
ठळक मुद्देममता बॅनर्जी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. 'दिल्लीच्या जनतेने भाजपाला नाकारलं आहे. आता येथे फक्त विकासच काम करेल''जनता आता सीएए, एनआरसी आणि एनपीआरला देखील नाकारेल'

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे. आपने 60 हून अधिक मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत केजरीवाल सरकार येणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं आहे. दिल्लीच्या जनतेने भाजपाला नाकारलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपाप्रमाणेच लोक सीएए, एनआरसी, एनपीआरला नाकारतील असं देखील ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. 

ममता बॅनर्जी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधीचं एक ट्विट केलं आहे. 'अरविंद केजरीवाल यांचे विजयासाठी अभिनंदन. दिल्लीच्या जनतेने भाजपाला नाकारलं आहे. आता येथे फक्त विकासच काम करेल. जनता आता सीएए, एनआरसी आणि एनपीआरला देखील नाकारेल' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. आठ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपने तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीनं मुसंडी मारली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकार येण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्ष कार्यकर्त्यांना महत्त्वाची सूचना दिली. निवडणूक विजयानंतर फटाके फोडू नका, असं आवाहन केजरीवालांनी केलं आहे. दिल्लीतलं प्रदूषण वाढू नये, यासाठी केजरीवालांनी आपच्या कार्यकर्त्यांना ही सूचना केली आहे. 

दिल्लीत पुन्हा एकदा आपचं सरकार येणार असल्याचा विश्वास असल्यानं पक्षाच्या कार्यकर्त्यांना विजयोत्सव साजरा करण्याची तयारी केली आहे. आपच्या मुख्यालयातून मिठाईची ऑर्डर देण्यात आली आहे. सर्वच एक्झिट पोल्सनी दिल्लीत आपचंच सरकार कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच आपनं मोठी मुसंडी मारली. दिल्लीतआपच्या झाडूची जादू कायम राहणार की भाजपाचं कमळ फुलणार, याचा फैसला आज होणार आहे.

जामिया मिलिया, जेएनयू व शाहीनबाग येथील सीएएविरोधी आंदोलन हे निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे बनले होते. ही निवडणूक आम आदमी पक्षासाठी अटीतटीची, भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेतृत्व कसोटी पाहणारी, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. निवडणूक प्रचारात स्थानिक ते राष्ट्रीय मुद्दे प्रचारात गाजले. अनेक आयाराम-गयारामही यंदा रिंगणात उतरले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करण्याची कुठलीही संधी सोडली नाही. आरोप-प्रत्यारोपांच्या या  मालिकेत मतदारांना आकर्षित करण्यासाठीही सर्वच पक्षांनी आतोनात प्रयत्न केले. 


महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Election Results Live: आपकडून 60चा आकडा पार; दिल्लीत फिर एक बार केजरीवाल

Delhi Election Result: दिल्लीत कोणता उमेदवार कुठल्या मतदारसंघातून जिंकला?; जाणून घ्या लिस्ट

Delhi Election Results : ...तरीही भाजपा केजरीवालांचा पराभव करू शकली नाही; उद्धव ठाकरेंकडून दिल्लीकरांचं अभिनंदन

Delhi Election Results : व्हॅलेंटाईन डे अन् केजरीवालांचं नातं खास; याच दिवशी दोनदा घडवला इतिहास

Delhi Election Result 2020 : दिल्लीतील दहा 'हॉट सीट'; जाणून घ्या कोण पुढे, कोण मागे?

 

Web Title: Delhi Election Results Mamata Banerjee congratulates Arvind Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.