नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे आकडे समोर येत असून, पुन्हा आम आदमी पार्टीचं सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तर 15 वर्षे दिल्लीत आपला मुख्यमंत्री असलेला काँग्रेस पक्षाला अजूनही भोपळा सुद्धा फोडता आला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यलयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तनुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे आकडे समोर येत असून पुन्हा केजरीवाल यांची सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर काँग्रेसला 70 जागांपैकी एकही जागावर आतापर्यंत आघाडी मिळू शकली नाही. त्यामुळे दिल्लीत काँग्रेसचा सुपाडा साप होणार असल्याचे बोलले जात आहे.
तर निकालाचे आकडे पाहून दिल्लीतील काँग्रेसचे नेते गायब झाली असून त्यांनी आपली फोन बंद करून ठेवली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या दिल्ली कार्यलयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पक्षाच्या कार्यलयात बोटावर मोजण्या इतकी कार्यकर्ते पाहायला मिळत असून, महत्वाची सर्व नेत्यांनी कार्यलयात न येणे पसंद केले असल्याचे चित्र आहे.