राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिममध्ये व्यायाम करत असताना शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. याप्रकरणी जिम चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीच्या रोहिणी येथील आहे. रोहिणी सेक्टर १९ मध्ये राहणारा सक्षम प्रुथी हा रोहिणी परिसरातील सिम्प्लेक्स फिटनेस झोनमध्ये व्यायामासाठी जात होता. सक्षमम असं तरुणाचे नावे आहे. त्याचे बी.टेक. पूर्ण झालं आहे. तो गुरुग्राममधील एका कंपनीत कामाला होता. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सक्षम हा व्यायाम करत असताना ट्रेडमिलमध्ये शॉक लागला. यानंतर त्याची प्रकृती बिघडली.
तुम्हालाही भारत सरकारचा मेसेज आला का? घाबरू नका, जाणून घ्या कारण
या घटनेनंतर सक्षमला त्याच्या मित्रांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर आले.
ट्रेडमिलमध्ये विजेचा शॉक लागून सकमचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तो जीममध्ये वर्कआऊट करत असताना ट्रेडमिलला विजेचा धक्का बसला. सक्षमला करंटचा फटका बसला. या प्रकरणी सक्षमच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून जिमचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे.