शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

"ED एंटरटेनमेंट डिपार्टमेंट बनले आहे...", संजय सिंह यांचे न्यायालयात विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 5:54 PM

विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांच्या न्यायालयात संजय सिंह यांना हजर करण्यात आले. 

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजय सिंह यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने शुक्रवारी 27 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. ईडीच्या रिमांडची मुदत संपल्यानंतर संजय सिंह यांना न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांच्या न्यायालयात संजय सिंह यांना हजर करण्यात आले. 

ईडीने  संजय सिंह यांच्या कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयाने 27 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. संजय सिंह यांच्या वकिलाने न्यायालयात युक्तिवाद केला की, संजय सिंह यांना तुरुंगात आवश्यक वैद्यकीय साहित्य पुरवले जावे. त्यावर न्यायालयाने संजय सिंह यांना तुरुंगात औषधे आणि वैद्यकीय उपकरणे (शुगर पॅच) उपलब्ध करून द्यावीत, असे आदेश दिले आहेत.

माझी क्वचितच चौकशी झाली, असे संजय सिंह यांनी हजेरीदरम्यान न्यायालयात सांगितले. इतकेच नाही तर ईडी हे एंटरटेनमेंट डिपार्टमेंट बनल्याचे संजय सिंह म्हणाले. तसेच, मी ईडीकडे कोणाचीही तक्रार केली असता काहीही झाले नाही, असे संजय सिंह यांनी सांगितले. दरम्यान, अशा विधानांवर नाराजी व्यक्त करत न्यायालयाने म्हटले की, संजय सिंह यांना असे काही म्हणायचे असेल तर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर व्हावे. 

याचबरोबर, व्हीसीमार्फत हजर व्हायचे आहे की न्यायालयात यायचे आहे, असे न्यायालयाने विचारले असता, संजय सिंह म्हणाले की, मी न्यायालयात हजर राहणार आहे. दरम्यान, कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने 4 ऑक्टोबर रोजी राज्यसभा सदस्य संजय सिंह यांना अटक केली होती.

टॅग्स :AAPआपCourtन्यायालय