Delhi Flood: यमुना नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे राजधानी दिल्ली पाण्याखाली गेली आहे. या पाण्यामुळे शुक्रवारी(दि.14) दुपारी तीन वाजता मुकुंदपूर चौकात मोठी दुर्घटना घडली. साचलेल्या पाण्यात आंघोळीसाठी गेलेल्या 3 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. मुलांचे वय 14 ते 15 वर्षांच्या दरम्यान आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदपूर येथील एका मैदानात पावसाचे पाणी साचले होते. त्यात ही मुले आंघोळीसाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने मुले बुडायला लागली. बुडणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी एका हवालदाराने पाण्यात उडीही मारली, मात्र तोपर्यंत मुलांचा मृत्यू झाला होता.
पाण्यापासून दूर राहण्याचा सल्लादिल्ली सरकारने सांगितले की, सर्व बाधित जिल्ह्याचे कलेक्टर, I&FC विभाग, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन, दिल्ली पोलिस आणि इतर विभाग पुराचा सामना करण्यासाठी अलर्ट मोडवर आहेत. सातत्याने समन्वय साधला जात आहे. एनडीआरएफच्या 15 तुकड्या दिल्लीत तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफने आतापर्यंत 4346 लोक आणि 179 पशुधनाची सुटका केली आहे.
सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. हे भाग पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहेत. लोकांना पूरस्थितीची माहिती देण्यासाठी सातत्याने घोषणा केल्या जात आहेत. अशा प्रत्येक ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि सीडीव्ही तैनात करून सल्ला दिला जात आहे. लोकांना नदीच्या पाण्यापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या भागात पुराचे पाणी शिरलेबेला रोड, राजकिशोर रोड, सिव्हिल लाईन्स, लाल किल्ला (आउटर रिंग रोड), यमुना बाजार, ISBT काश्मिरी गेट, शंकराचार्य रोड, मजनू का टिळा, खड्डा कॉलनी, बाटला हाऊस, विश्वकर्मा कॉलनी, शिव विहार, खजुरी कॉलनी, सोनिया विहार, किंग्सवे कॅम्प, जीटीबी नगर, राजघाटाजवळ, वजिराबाद, भैरव रोड आणि मठ मार्केट भागात पाणी तुंबले आहे.