ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - गुडांसोबत झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी एका वॉण्टेड गुंडाला अटक केली आहे. या गुंडावर 25 हजाराचं इनाम होतं. नेहरु प्लेस परिसरात इरॉस हॉटेलजवळ पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर गुंडांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. रात्री 2.30 च्या सुमारास हा गोळीबार सुरु झाला. अटक टाळण्यासाठी गुंडांनी गोळीबार करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तर देत गोळीबार केला अशी माहिती पोलीस उपायुक्त रोमिल यांनी दिली आहे.
'शूटआऊट झाल्यानंतर अकबर उर्फ दानिशला अटक करण्यात आली. मात्र त्याचा साथीदार आसीफ इतर जणांसोबत पळून जाण्यास यशस्वी झाला. अकबर हा कुख्यात दरोडेखोर आहे. चोरी, दरोडे तसंच खुनाच्या प्रयत्नांमधील अनेक गुन्ह्यात तो वॉण्टेड होता,' अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अकबरवर पोलिसांनी 25 हजारांचं इनामदेखील जाहीर केला होता. डिसेंबर 2016 रोजी दक्षिण दिल्लीत झालेल्या एका शूटआऊटनंतर हा इनाम जाहीर करण्यात आला होता.
'या शूटआऊटमध्ये दोन पोलिसांना गोळ्या लागल्या, मात्र बुलेटप्रूफ जॅकेट घातलं असल्याने त्यांना किरकोळ जखमा झाल्या असल्याचं', पोलीस उपायुक्त रोमिल यांनी सांगितलं आहे.
Delhi: After shootout near Nehru Place Metro Station, Police nabbed criminal Akbar, carrying a reward of Rs25k on his head.His aide escaped. pic.twitter.com/ZVyxhFOBwO— ANI (@ANI_news) February 6, 2017