CM Arvind Kejriwal ( Marathi News ) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मद्य धोरण प्रकरणात मनी लाँडिग घोटाळा आरोपात दिल्ली हायकोर्टाने सीएम केजरीवाल यांच्या याचिकेवर दोन आठवड्यात जबाब देण्यास सांगितले आहे. दिल्ली हायकोर्टात पुढची सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे.
आज मद्य धोरण प्रकरणात दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. आज ईडीने कोर्टात कागदपत्रे जमा केली. ईडीकडून अतिरिक्त सॉलिसीटर एस व्ही राजू यांनी कोर्टात कागदपत्रे जमा केली, आणि म्हटले की, आम्ही कोर्टाच्या सांगण्यावरुन कागदपत्रे देत आहोत, याचिकाकर्ते याची मागणी करु नका.
सीएम केजरीवाल यांनी ईडीविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. केजरीवाल यांच्याकडून वकील अभिषेक सिंघवी उपस्थित होते, सिंघवी म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर अटक करा, निवडणुका तरी लढवण्यासाठी वेळ द्या. तुम्हाला एवढेच समाधान मिळणार असेलतर जूनमध्ये अटक करा. कमीत कमी निवडणुका लढवण्यापर्यंत दंडात्मक कारवाईपासून सुरक्षा मिळाली पाहिजे, मला निवडणूक लढायला द्यायला पाहिजे, असंही केजरीवाल यांच्याकडून वकील सिंघवी म्हणाले.
सीएम अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून आठवेळा समन्स
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने आता पर्यंत आठवेळा समन्स पाठवण्यात आले आहेत. केजरीवाल अजूनही चौकशीसाठी हजर झालेले नाही. दरम्यान, आप'कडून ईडीवर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी अटक करण्यात येणार असल्याचा आरोप आपने केला आहे.