नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली आहे. सत्येंद्र जैन यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सत्येंद्र जैन यांच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्याची तयारी सुरू आहे. यासाठी त्यांना साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलविण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या त्यांच्यावर दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशलिस्ट हॉस्टिपटलमध्ये उपचार सुरु आहेत. काल त्यांच्या प्रकृतीत थोड्या प्रमाणात सुधारणा झाली. मात्र, त्यांचा ताप कमी झालेला नाही. आज पुन्हा सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली असल्याचे समजते.
सीटी स्कॅन केल्यानंतर आढळून आले की, त्यांचा फुफ्फुसात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्यासाठी मॅक्समध्ये हलविण्यात येणार आहे. यासाठी राजीव गांधी हॉस्पिटलने आधी परवानगी नाकारली. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनुसार, त्यांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येणार असल्याचे समजते.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची पहिल्यांदा कोरोनाची टेस्ट करण्यात होती. पण, ती टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र, त्यानंतर 15 जूनला त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांचा तापही वाढला. यानंतर त्यांची पुन्हा एकदा कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यावेळी या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन सतत बैठकांना उपस्थित होते. गेल्या काही दिवसांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. त्या बैठकीत सत्येंद्र जैन आरोग्यमंत्री म्हणून उपस्थित होते.
याचबरोबर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना टेस्ट करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल ताप आणि खोकल्याच्या त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. मात्र, त्यांच्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा काम सुरू केले.
आणखी बातम्या...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतोय - संजय राऊत
अक्साई चीन आता परत घेण्याची वेळ आली आहे - जामयांग नामग्याल
मलाला युसूफझाई झाली 'ग्रॅज्युएट', आनंद साजरा करत सांगितलं 'फ्युचर प्लॅनिंग'
आकाशात दिसला रहस्यमय असा पांढरा फुगा; लोक म्हणाले, 'एलियन शिप'
Encounters In Jammu & Kashmir: सुरक्षा दलांना मोठं यश, जम्मू-काश्मीरमध्ये 8 दहशतवाद्यांना कंठस्नान