शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
4
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
5
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
6
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
7
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
8
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
9
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
10
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह उमेदवार रंगले ऐसपैस गप्पांमध्ये
13
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
14
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड?, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
15
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
16
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
17
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
18
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
19
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
20
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!

निजामुद्दीन मरकझ उघडण्यास दिल्ली हायकोर्टाची मुभा, केवळ ५० जण नमाज अदा करू शकणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 7:01 PM

Delhi hc orders to open nizamuddin markaz offering ramzan namaz : सध्या कोर्टाने फक्त एकच मजला उघडण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देरमजानच्या पार्श्वभूमीवर केवळ ५० लोकांना नमाज अदा करण्यासाठी मरकजमध्ये प्रवेश मिळेल.

रमजान दरम्यान दिल्लीउच्च न्यायालयाने निजामुद्दीनचा मरकज उघडण्याचा मोठा निर्णय दिला. हायकोर्टाने मरकजमधील ५० लोकांना रमजान महिन्यात ५ वेळा नमाज अदा करण्यास परवानगी दिली आहे. सध्या कोर्टाने फक्त एकच मजला उघडण्याचे आदेश दिले आहेत.कोरोना महामारीच्या काळात स्पष्टीकरण देताना कोर्टाने म्हटले आहे की, रमजानच्या पार्श्वभूमीवर केवळ ५० लोकांना नमाज अदा करण्यासाठी मरकजमध्ये प्रवेश मिळेल. या कालावधीत कोर्टाने सामाजिक अंतर पाळण्याचे व डीडीएमएच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोर्टाने असेही म्हटले आहे की, या काळात डीडीएमएचे कोणतेही नवीन मार्गदर्शक सूचना किंवा ऑर्डर जारी झाल्यास निजामुद्दीनच्या मरकझ मशिदीनेही ते पालन करावे. त्याचवेळी मरकजची बाजू मांडण्यासाठी हजर असलेले वकील रमेश गुप्ता म्हणाले की, कोर्टाच्या आदेशाचे आपण काटेकोरपणे पालन करू.दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे की, केंद्राने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात लोकांना इतर धार्मिक स्थळांवर जाण्याची परवानगी आहे की नाही हे स्पष्ट केले नाही. १० एप्रिलच्या डीडीएमएच्या अधिसूचनेत गर्दी वाढवू नका असे सांगितले आहे, परंतु कोणत्याही धार्मिक स्थळ पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या नाहीत. केंद्र सरकारचे वकील रजत नायर यांनी सुनावणीदरम्यान कोर्टाला सांगितले की, चैत्र नवरात्रीत आरती दरम्यान गर्दी होऊ नये यासाठी कालकाजी मंदिरात ऑनलाइन दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच गोल मार्केटच्या चर्चनेही लोकांना तेथे येण्यास रोखले. 

रमजान दरम्यान निजामुद्दीन मरकझ उघडण्याच्या संबंधित प्रकरणात केंद्राने दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रतिज्ञापत्रात दिल्ली पोलिसांमार्फत सांगण्यात आले होते की, दिल्लीत कोरोनाची वाढती घटना लक्षात घेता डीडीएमएने १० एप्रिल रोजी सर्व धार्मिक स्थळांवर गर्दी रोखण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. अशा परिस्थितीत दिल्लीतील अलीकडची परिस्थिती पाहता कोर्टाने मरकज उघडायचे की नाही याचा निर्णय स्वतः घ्यावा. या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की, सामाजिक अंतर पळून मरकजचा पहिला मजला उघडण्यास परवानगी दिली गेली तर त्यातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस व प्रशासनाकडे ठेवावेत. यावर आता कोर्टाने निकाल दिला आहे.

गेल्या वर्षी उडालेली खळबळ

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना महामारीच्यादरम्यान दिल्लीतील निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात मरकजमध्ये जवळपास १४०० लोक राहिले होते. ज्यामध्ये विदेशी नागरिकांचाही समावेश होता. विदेशींमध्ये जास्तकरून मलेशिया आणि इंडिनेशियाचे नागरिक होते. दिल्लीत येण्याआधी हा ग्रुप २७ फेब्रुवारी ते १ मार्चच्या २०२० दरम्यान मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमधील एका धार्मिक कार्यक्रमात सामील झाला होता. यामधील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रशासनला समजल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdelhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्याNamajनमाजRamzanरमजान