नवी दिल्ली - दीपिका पदुकोण स्टारर 'छपाक' रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही दिवसांपूर्वी छपाकचे प्रदर्शन थांबवण्यासाठी दिल्ली पटियाल हाऊस कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. लक्ष्मीच्या वकील अपर्णा भट्ट यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता छपाकच्या निर्मात्यांना दिल्ली हायकोर्टाने आदेश दिले आहेत. पीडितेच्या वकील अपर्णा भट यांना कथेचे श्रेय द्या असे हायकोर्टाने म्हटले आहे.
अपर्णा भट यांना कथेचे श्रेय न दिल्यास 15 जानेवारीनंतर छपाक हा चित्रपटगृहात दाखवला जाणार नाही असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. अपर्णा भट या चित्रपटाच्या निर्मात्यांवर नाराज आहेत. निर्मात्यांनी चित्रपटात त्यांच्या नावाचा कुठेच उल्लेख केलेला नाही तसेच कुठेच क्रेडिटदेखील देखील दिलेले नाही. या कारणामुळे त्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी याचिका दाखल केली. त्यांच्या याचिकेवर शनिवारी (11 जानेवारी) कोर्टात सुनावणी झाली. कोर्टात अपर्णा यांनी छपाकची दिग्दर्शिका मेघना गुलजार आणि निर्माती दीपिका पदुकोण विरोधात याचिका दाखल केली होती. अपर्णा यांनी जवळपास 10 वर्षे लक्ष्मीची केस कोर्टात लढली होती आणि जिंकलीसुद्धा. यासाठी त्यांनी कोणतेचे मानधन घेतले नव्हते.
'अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालची केस अनेक वर्षे लढली मात्र या चित्रपटात मला कुठेच क्रेडिट दिले गेले नाही' असे याचिकेत अपर्णा यांनी म्हटले होते. तसेच अपर्णा यांचे म्हणणेआहे की, त्यांनी छपाक चित्रपटाच्या स्क्रिप्टसाठी सुद्धा मदत केली होती. छपाकच्या निर्मात्यांनी चित्रपटात क्रेडिट देण्याचा विश्वास दिला होता. मात्र असे प्रत्यक्षात झाले नसल्याचे अपर्णा यांचे म्हणणे होते. जोपर्यंत क्रेडिट लिस्टमध्ये त्यांचं नाव सामिल होत नाही तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका अशी मागणी अपर्णा यांनी केली होती. जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनामध्ये दीपिकाने सहभाग घेतला होता. यावरून तिचा चित्रपट छपाकवर बहिष्कार घालण्याची मोहीम ट्रोलर्सनी राबविली आहे. तर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे
महत्त्वाच्या बातम्या
विरोधकांच्या बैठकीआधी नरेंद्र मोदींसोबत एकाच मंचावर दिसणार ममता बॅनर्जी
युक्रेनचे विमान चुकून पाडले, इराणी सैन्याने दिली कबुली
Today's Fuel Price : दरवाढीचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; पेट्रोल 80 पार
गाई-म्हशीचे दूध दोन रुपयांनी महागले, उद्यापासून अंमलबजावणी
ट्रक-बसची भीषण टक्कर होऊन लागली आग, 20 जणांचा होरपळून मृत्यू, 21 जण जखमी