शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क- न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 10:04 AM

पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयानं दिला आहे.

नवी दिल्लीः पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयानं दिला आहे. पतीच्या एक तृतीयांश पगारावर पत्नीचा अधिकार असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. पतीच्या पगाराच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. पतीच्या पगाराचं वाटत दोन भागात होत असून, एक भाग पत्नीला दिला गेला पाहिजे. एका महिला याचिकाकर्त्याच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. महिलेला पतीच्या पगारातील 30 टक्के हिस्सा मिळालाच पाहिजे, असं न्यायालयानं म्हटलं आहे. महिलेचं लग्न 7 मे 2006 झालं होतं. तिचा पती सीआयएसएफमध्ये इन्स्पेक्टर आहे. 15 ऑक्टोबर 2006 रोजी दोघेही विभक्त झाले. त्यानंतर महिलेनं पोटगीसाठी न्यायालयात अर्ज केला. 21 फेब्रुवारी 2008 रोजी पत्नीला पोटगी ठरवण्यात आली. त्याअंतर्गत पतीच्या पगाराचा 30 टक्क हिस्सा पत्नीला देण्याचं ठरलं. या निर्णयाला महिलेच्या पतीनं आव्हान दिलं. त्यानंतर तो भत्ता 30 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आणण्यात आला. त्यानंतर या निर्णयाला महिलेनं दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं.पतीच्या वकिलांनी न्यायालयात पत्नीच्या खात्यात कोण कोण पैसे टाकते, याची माहिती मागवली. तर वडीलही महिलेला खर्चासाठी पैसे देत असल्याचं समोर आलं. परंतु त्यानंतर न्यायालयानं पुन्हा एकदा पत्नीला 30 टक्के पोटगी देण्याचा निर्णय दिला. पतीच्या पैसे वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यानुसार महिलेला 30 टक्क्यांच्या लाभ देण्यात यावा, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :Courtन्यायालय