नवी दिल्ली : आयकर विभागाने पाठविलेल्या 2011-12 या आर्थिक वर्षाच्या परताव्याच्या पुर्नमुल्यांकन नोटीसीविरोधात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, आज न्यायालयाने हे आव्हान फेटाळून लावले असून आयकर विभाग केव्हाही जुन्या प्रकरणांची चौकशी करू शकत असल्याचे स्पष्ट केले आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात आयकर विभागाने राहुल आणि सोनिया गांधी यांना नोटीस पाठविली होती. यावर न्यायालयाने आयकर विभागाला जुन्या प्रकरणांची चौकशी सुरु करण्याचा अधिकार असून करदात्याने त्याबाबतचे दस्तावेज घेऊन चौकशीला सामोरे जाणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट केले.