लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : परीक्षांमध्ये कॉपी आणि फसवणूक करणे, हे प्लेगच्या साथीसारखे आहे. ज्यामुळे समाज आणि शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होते. असे अयोग्य मार्ग वापरणाऱ्यांना जड हाताने धडा शिकविला पाहिजे, असे मत दिल्लीउच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण व्यवस्थेची अखंडता अतुलनीय असायला हवी, असे निरीक्षण नोंदवत मुख्य न्यायधीश सतीश चंद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, जे विद्यार्थी अयोग्य मार्गाचा अवलंब करतात ते राष्ट्र घडवू शकत नाहीत. या प्रकरणात, काही विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका फोडली होती.
गोपनीयता राखा…
प्रश्नपत्रिका तयार करणारे, विद्यार्थी किंवा पर्यवेक्षक असोत, सर्व संबंधितांनी निर्दोष वर्तन करणे, गोपनीयता राखणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली. न्यायालयाने अपील फेटाळून लावले आणि एकल न्यायाधीशांच्या आदेशाला कोणत्याही हस्तक्षेपाची आवश्यकता नसल्याचे सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"