Oxygen Shortage: तुम्ही डोळेझाक करू शकता, आम्ही नाही; दिल्ली हायकोर्टाचे केंद्रावर ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 02:48 PM2021-05-04T14:48:18+5:302021-05-04T14:49:41+5:30

Oxygen Shortage: दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले.

delhi high court slams centre govt over oxygen shortage in delhi | Oxygen Shortage: तुम्ही डोळेझाक करू शकता, आम्ही नाही; दिल्ली हायकोर्टाचे केंद्रावर ताशेरे

Oxygen Shortage: तुम्ही डोळेझाक करू शकता, आम्ही नाही; दिल्ली हायकोर्टाचे केंद्रावर ताशेरे

googlenewsNext
ठळक मुद्देदिल्ली उच्च न्यायालयाचे ताशेरेदिल्लीला ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन द्यावादोन्ही पक्षांच्या बाजून जोरदार युक्तिवाद

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स, कोरोना लसीची कमतरता जाणवत आहे. ऑक्सिजन कमतरतेमुळे अनेकांचे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयासह देशातील अनेक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दिल्लीउच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले असून, तुम्ही डोळेझाक करू शकता, आम्ही नाही, असे म्हटले आहे. (delhi high court slams centre govt over oxygen shortage in delhi)

दिल्लीसह अनेक ठिकाणच्या रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजनच्या कमतरेतमुळे झाल्याचे अॅमिकस क्युरी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर, महाराष्ट्रात आताच्या घडीला ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा असून, तेथील काही ऑक्सिजन टँकर दिल्लीत पाठवले जाऊ शकतात, असा सल्ला न्यायालयाने दिला. 

“गैरमार्गाने केलेल्या कामाचा हेतू कधी शुद्ध राहत नाही”; न्यायालयाने सुजय विखेंना सुनावले

दिल्लीला ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन द्यावा

दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारत, सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीला ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन द्यावा, असे निर्देश दिले असल्यास दिल्लीला त्याप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला पाहिजे, असे स्पष्ट केले. तसेच न्यायालय मित्राने यावेळी ऑक्सिजनच्या स्टोअर केला जाऊ शकतो, यावर विचार व्हावा, असे न्यायालयाला सांगितले. 

“केंद्र सरकार लोकांच्या जीवाशी खेळतंय”; कर्नाटक घटनेवर काँग्रेसचा संताप

आरोप-प्रत्यारोप सुरूच

दिल्ली सरकारने उच्च न्यायालयात केंद्रावर आरोप करत ऑक्सिजन पुरवठा योग्य पद्धतीने केला जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र, हा आरोप फेटाळत दिल्लीला १२ जादा ऑक्सिजन टँकर पुरवले असल्याचे केंद्राच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. दिल्ली उच्च न्यायालयात दोन्ही पक्षांच्या बाजून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. 

मारुतीचे अनेक प्रकल्प तात्पुरते बंद; आता कंपनी ऑक्सिजनची निर्मिती करणार

दरम्यान, कर्नाटकातील चामराजनगर येथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तब्बल २४ जणांचा मृत्यू झाला. रविवार मध्यरात्री ही घटना घडली. चामराजनगर रुग्णालयाला बेल्लारी येथून ऑक्सिजन मिळणार होता. मात्र ऑक्सिजन येण्यास उशीर झाला. यामुळे ही दुर्घटना घडली. सांगण्यात येते, की मृत्यू झालेल्यांतील अधिकांश रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते. ऑक्सीजन सप्लाय थांबल्यानंतर ते तडफू लागले आणि त्यांचा मृत्यू झाला. 

Read in English

Web Title: delhi high court slams centre govt over oxygen shortage in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.