नवी दिल्ली : गुंतवणूक क्षमता निर्देशांकात दिल्लीने सर्वोच्च स्थान पटकावले असून, तामिळनाडू दुसऱ्या स्थानी आहे. राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेने (एनसीएईआर) हा निर्देशांक जारी केला आहे. पायाभूत सोयी व आर्थिक स्थिती आधारे दिल्लीने निर्देशांकात सर्वोच्च स्थान पटकावले.मार्च २0१६ मध्ये हा निर्देशांक सुरू केला होता. आर्थिक शासन, स्पर्धात्मकता व वृद्धीच्या संधी यांचा निर्देशांकात विचार केला जातो. याचा धोरणकार, व्यावसायिक, संभाव्य गुंतवणूकदार यांना निर्णय घेताना लाभ होणार आहे.
गुंतवणूक क्षमतेत दिल्ली सर्वोच्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 4:37 AM