नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांमध्ये राजधानी दिल्लीतभूकंपाचे धक्के बसत आहेत. यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण असताना आज पुन्हा एकदा दिल्लीत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत सातत्याने भूकंपाचे झटके बसत आहेत. सोमवारी (8 जून) दुपारी 2.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप होता, ज्याचं केंद्र हरियाणातील गुरुग्राम सांगितलं जात आहे. दोन महिन्यांत तब्बल 14 भूकंपाचे धक्के बसले आहेत.
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाची सुरुवात 12 एप्रिल (3.5 तीव्रता) ला झाली. आतापर्यंत 14 वेळा झटके बसले आहेत. या धक्क्यांना गांभीर्याने घेण्याची गरज असून हे मोठ्या भूकंपाचे संकेत असल्याचं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचं केंद्र दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राम पश्चिमेत जमिनीच्या 18 किमी खोल होतं. दुपारी एक वाजता दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्क जाणवले. यापूर्वी आलेल्या भूकंपांचं केंद्र कधी दिल्ली, कधी फरिदाबाद, तर कधी रोहतक होतं.
आयआयटीच्या विविध तज्ञांनी दिल्ली-एनसीआरमध्ये मोठा भूकंप येणार असल्याचा इशारा दिला आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सौम्य धक्के हे तीव्र भूकंपाचे संकेत असतात. आयआयटी धनबादच्या भूभौतिकीशास्त्र आणि भूकंपशास्त्र विभागाच्या मते, दिल्ली आणि एनसीआरमध्ये तीव्र क्षमतेचा भूकंप येऊ शकतो. आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांच्या मते, दिल्ली-हरिद्वार या पट्ट्यात तणाव आल्यामुळे जमीन हादरत आहे. यामुळेच झटके बसणं सुरुच राहणार आहे. छोट्या धक्क्यांना मोठ्या भूकंपाचे संकेत म्हणून पाहणं आवश्यक असल्याचं भूकंपशास्त्र राष्ट्रीय केंद्राचे माजी अध्यक्ष ए. के. शुक्ला यांनी सांगितलं.
भूकंपाच्या बाबतीत देशाचं वर्गीकरण चार विभागात केलेलं आहे. तीव्र क्षमता प्रदेश V ते कमी तीव्रता प्रदेश II असं हे वर्गीकरण आहे. दिल्लीचा समावेश IV मध्ये होतो, ज्याला गंभीर मानलं जातं. राजधानी दिल्ली देशातील सर्वाधिक भूकंपाचा अनुभव घेणाऱ्या शहरांपैकी एक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. एकीकडे संपूर्ण देश कोरोना सारख्या संकटाविरुद्ध लढत असताना दिल्लीत सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. दिल्ली भूकंपाने हादरत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
'इम्रान खानपेक्षा आदित्यनाथांचं नेतृत्व चांगलं'; पाकिस्तानात योगींचं भरभरून कौतुक
गुगल सर्चमध्ये दिसताहेत Whatsapp नंबर; कोणीही करू शकतं मेसेज पण कसं...
"...म्हणून चीनी मालावर बहिष्काराचा 'सर्जिकल स्ट्राईक' हवाच"
CoronaVirus News : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर असताना मुंबईकरांसाठी 'ही' माहिती सुखावणारी
Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा
Today's Fuel Price: इंधन दराचे 'अच्छे दिन' संपले, पेट्रोल-डिझेल आज पुन्हा महागले!
CoronaVirus News : ब्लड प्रेशर असलेल्या कोरोनाग्रस्तांना 'ही' चूक पडेल महागात; वेळीच व्हा सावध