शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

"माझा एन्काउंटर होऊ शकतो", आप खासदार संजय सिंह यांचा न्यायालयात दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 4:16 PM

न्यायालयाने संजय सिंह यांना त्यांचे कुटुंबीय आणि वकील यांना कोर्ट रूममध्ये 10 मिनिटे भेटण्याची परवानगी दिली.

नवी दिल्ली :  दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी न्यायालयात एन्काउंटर होण्याची भीती व्यक्त केली आहे. न्यायालयात सुरक्षेचा हवाला देत संजय सिंह यांनी सांगितले की, "रिमांड घेताना मला रात्री 10.30 वाजता बाहेर जायचे असल्याचे सांगितले. मला कुठे नेत आहे असे मी विचारले असता त्यांनी मला तुघलक रोड पोलीस ठाण्यात नेत असल्याचे सांगितले. यानंतर मी विचारले की न्यायाधीशांना सांगितले का? तर ते म्हणाले की वरून फोन आला आहे. मी नकार दिल्यावर ते लिखित स्वरूपात द्या, असे सांगितले."

जर 3 ऑक्टोबरलाच ईडी तयार होती, तर पेस्टिसाइड आधी का केले नाही? पहिल्या दिवशी रात्री 10:30 वाजता आणि दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 वाजता काढण्यात येणार असल्याचे सांगितले. मला वर पाठवायची तयारी कोणाच्या सांगण्यावरून झाली? तुमच्या समोर सांगतिले जाते की, ईडीच्या कार्यालयात ठेवण्यास तयार आहे, मात्र तेथे गेल्यावर त्यांनी त्याला बाहेर पोलिस ठाण्यात नेण्याचे बोलले, असे संजय सिंह यांनी न्यायालयात सांगितले. 

याचबरोबर, जर त्यांनी मला बाहेर नेले आणि माझा एन्काउंटर केला तर कोणाला उत्तर देणार? असेही संजय सिंह म्हणाले. दरम्यान, संजय सिंह यांच्या ईडी कोठडीत 5 दिवसांची वाढ करण्याच्या मागणीवर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. तसेच, न्यायालयाने संजय सिंह यांना त्यांचे कुटुंबीय आणि वकील यांना कोर्ट रूममध्ये 10 मिनिटे भेटण्याची परवानगी दिली.

दुसरीकडे, ईडीतर्फे हजर झालेल्या वकिलांनी सांगितले की, संजय सिंह कोठडीतील प्रश्नांची योग्य उत्तरे देत नाहीत. ते तपासात सहकार्य करत नाही. त्यांना फोनच्या डेटाबाबत विचारले असता, त्यांनी त्यावरही समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच, नुकताच चंदीगडमध्ये छापा टाकण्यात आला आहे, ज्या व्यावसायिकाच्या वतीने छापा टाकण्यात आला होता, त्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यासंबंधीचा खुलासा सध्या केला जाऊ शकत नाही. 

या प्रकरणात लाच मागितल्याचे पुरावे असल्याची माहिती ईडीने न्यायालयात दिली. ईडी या आरोपांची चौकशी करत आहे. ईडीने एका व्यावसायिकाचे जबाब नोंदवले. त्याचा खुलासा सध्या न्यायालयात करता येणार नाही. तसेच, दारू व्यापाऱ्यांचे परवाने काढण्यासाठी लाच मागितली जात होती, असे ई़डीने म्हटले आहे. याशिवाय, संजय सिंह यांचा जवळचा सहकारी सर्वेश मिश्राही तपासात सहकार्य करत नसल्याचे ईडीने म्हटले आहे. ईडीने सांगितले की, सर्वेश मिश्रा यांना उद्या नवीन समन्स बजावण्यात आले आहे.

टॅग्स :AAPआपCourtन्यायालय