ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 6 - राजधानी आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. दिल्लीतील वायू प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. राजधानीत अनेक ठिकाणी प्रदूषणाची पातळी 40 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम झाला असून, अनेकांना डोळे, घसा आणि नाकाचे विकार उद्भवू लागले आहे. दरम्यान वाढत्या प्रदूषणावर सरकार नियंत्रण करण्यात अपयशी ठरल्यानं दिल्लीकर रस्त्यावर उतरले आहेत. पोस्टरच्या माध्यमातून दिल्लीकरांनी केजरीवाल सरकारला 'प्रदूषणावर उपाय शोधा, श्वासोच्छवास घेण्यासाठी झाडे लावा', असा प्रकारचे सल्ले दिले आहे. दिवाळीनंतरच प्रदूषणात भरमसाट वाढ झाली आहे. प्रदूषणामुळे दिल्लीतील अनेक भागात धुरक्याचं साम्राज्य पसरलं आहे. दिल्ली सरकारनं नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. एअर क्वालिटी इंडेक्सच्या मते, दिल्लीतली वायू प्रदूषणाची गती तीव्रतेने वाढते आहे. दिवाळीनंतर वायू प्रदूषणाचा निर्देशांक मूल्य 445हून 485 एवढा वाढला आहे. जवळपास दिल्लीच्या प्रदूषणात 40 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या वाढत्या प्रदूषणासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुपारी 12.30 वाजता तातडीची बैठकही बोलावली आहे.
#RightToBreathe Children & citizens of Delhi hold protest at Jantar Mantar against ineffectiveness of admin in tackling pollution. pic.twitter.com/Q3xVFlGboQ— ANI (@ANI_news) November 6, 2016