Delhi MCD Election Result: दिल्ली MCD मध्ये काँग्रेसला धक्का; दोन विजयी नगरसेवक AAP मध्ये सामील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 06:14 PM2022-12-09T18:14:06+5:302022-12-09T18:15:25+5:30
Delhi MCD Election Result: दिल्ली महानगरपालिका निवडणुका संपताच काँग्रेसला धक्के बसणे सुरू झाले आहे.
Delhi MCD Election Result: 7 डिसेंबर रोजी दिल्ली महापालिका निवडणुकीचे निकाल हाती आले. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथून लावली. तर काँग्रेसलाही अतिशय कमी जागा मिळाल्या. यानंतर आता काँग्रेसला काँग्रेसला धक्का बसण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवारी काँग्रेसच्या दोन नवनिर्वाचित नगरसेवकांनी पक्ष सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे.
दिल्ली काँग्रेसचे उपाध्यक्ष अली मेहंदी यांच्याशिवाय ब्रिजपुरी प्रभागातील काँग्रेस नगरसेवक नाझिया खातून आणि मुस्तफाबाद प्रभागातील नगरसेवक सबीला बेगम यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. 250 प्रभागांच्या दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाचे 134 उमेदवार विजयी झाले आहेत.
भाजपने 104 जागा जिंकल्या आहेत. तसेच काँग्रेसला 9 जागा मिळाल्या होत्या. आता त्यांचे 2 नगरसेवक निघून गेले आहेत. अशा स्थितीत MCD मध्ये काँग्रेसचे फक्त 7 नगरसेवक उरले आहेत. विशेष म्हणजे, दिल्ली महापालिका निवडणुकीत काँग्रेसची ही आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी ठरली आहे.