Delhi MCD Election Results 2022: केजरीवाल, मनोज तिवारी, गंभीर आणि सिसोदिया…दिग्गज नेत्यांच्या वॉर्डमध्ये काय परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 01:42 PM2022-12-07T13:42:03+5:302022-12-07T13:44:03+5:30

Delhi MCD Election Results 2022: दिल्ली महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. 250 जागांपैकी बहुतांश जागांवर भाजप आणि आपमध्ये निकराची लढत पाहायला मिळत आहे.

Delhi MCD Election Results 2022: arvind Kejriwal, Manoj Tiwari, gautam Gambhir and manish Sisodia...what is the situation in veteran leaders' wards | Delhi MCD Election Results 2022: केजरीवाल, मनोज तिवारी, गंभीर आणि सिसोदिया…दिग्गज नेत्यांच्या वॉर्डमध्ये काय परिस्थिती

Delhi MCD Election Results 2022: केजरीवाल, मनोज तिवारी, गंभीर आणि सिसोदिया…दिग्गज नेत्यांच्या वॉर्डमध्ये काय परिस्थिती

googlenewsNext

Delhi MCD Election Results 2022: दिल्ली महानगरपालिका (MCD) निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. एमसीडीमधील 250 जागांपैकी बहुतांश जागांवर भाजप आणि आपमध्ये निकराची लढत पाहायला मिळत आहे. मात्र, आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये आप भाजपपेक्षा पुढे गेल्याचे दिसते. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, भाजप खासदार परवेश वर्मा, गौतम गंभीर आणि मनोज तिवारी यांसारख्या दिग्गज नेत्यांनी मतदान केलेल्या जागांवरही सर्वांचे लक्ष लागले आहे.

केजरीवाल यांच्या प्रभागात काय झाले? 
आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रभाग क्रमांक 74 चांदणी चौकात मतदान केले होते. येथे 'आप'ने पुनरदीप सिंह, भाजपने रवींद्र सिंह आणि काँग्रेसऩे राहुल शर्मा यांना उमेदवारी दिली. सध्या येथे आपचे उमेदवार पुनरदीप सिंह यांनी आघाडी घेतली आहे.

सिसोदिया यांच्या प्रभागाची स्थिती
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्ली एमसीडीच्या वॉर्ड क्रमांक 203 लक्ष्मी नगरमध्ये मतदान केले. येथे 'आप'ने मीनाक्षी शर्मा, भाजपने अलका राघव आणि काँग्रेसने सुनीता धवन यांना उमेदवारी दिली. येथे आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये निकराची लढत सुरू आहे.

मनोज तिवारी आणि कपिल मिश्रा यांचा प्रभाग
भाजप खासदार मनोज तिवारी हे प्रभाग क्रमांक 231 घोंडा येथे राहतात. तर, भाजप नेते कपिल मिश्रा यांनीही याच प्रभागात मतदान केले. भाजपने प्रीती गुप्ता, आपने विद्यावती आणि काँग्रेसने रिटा यांना उमेदवारी दिली. येथे आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये भाजप आणि आप यांच्यात निकराची लढत आहे.

आदेश गुप्ता, गौतम गंभीर आणि राघव चढ्ढा यांचा प्रभाग
दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता हे प्रभाग क्रमांक 141 राजेंद्र नगरमध्ये राहतात. माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर आणि आपचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा हेही याच प्रभागातील रहिवासी आहेत. भाजपने मनिका निश्चल, आपने रती चावला आणि काँग्रेसने चीन मलिक यांना उमेदवारी दिली. येथे भाजप आणि आप यांच्यात निकराची लढत आहे.

गोपाल राय यांचा प्रभाग
आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते आणि दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी प्रभाग क्रमांक 234 कबीर नगरमध्ये मतदान केले. येथून भाजपने विनोद कुमार, आपने साजिद खान आणि काँग्रेसने मोहम्मद जरीफ यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद जरीफ येथे आघाडीवर आहेत.

अमानतुल्ला यांच्या प्रभागाची अवस्था
दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आणि आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी वॉर्ड क्रमांक 189 झाकीर नगरमध्ये मतदान केले. काँग्रेसने तीर वेळचे नगरसेवक शोएब दानिश यांची पत्नी नाझिया दानिश, आपने सलमा अरिज खान आणि भाजपने लता देवी यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवरही काँग्रेसच्या उमेदवार नाझिया यांनी आघाडी घेतली आहे.
 

Web Title: Delhi MCD Election Results 2022: arvind Kejriwal, Manoj Tiwari, gautam Gambhir and manish Sisodia...what is the situation in veteran leaders' wards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.