दिल्लीत महापालिकेत घवघवीत यश मिळवत आपने राज्यात आणि महापालिकेत आपलीच सत्ता आणली होती. असे असले तरी आपला महापौर आणि उपमहापौर पदासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागली होती. अखेर आज झालेल्या निवडणुकीत दिल्लीच्या महापौर आणि उपमहापौरपदी आपच्या उमेदवारांची निवड झाली आहे.
आपचे उपमहापौरपदाचे उमेदवार आले मोहम्मद इक्बाल यांना 147 मते मिळाली. तर भाजपच्या उमेदवार कमल बागडी यांना 116 मते मिळाली. एकूण 265 मतांपैकी २ मते अवैध ठरली. परंतू महापौर निवडणुकीत आपच्या शेली ओबेरॉय जिंकल्या आहेत. त्यांना 150 मते मिळाली, तर भाजपने त्यांच्या विरोधात रेखा गुप्ता यांना उमेदवारी दिली. त्यांना 116 मते मिळाली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजयानंतर ट्विट करत गुंड हरले, जनता जिंकली असे म्हटले. आज दिल्ली महानगरपालिकेत दिल्लीतील जनतेचा विजय झाला आणि गुंडगिरीचा पराभव झाला. डॉ.शैली ओबेरॉय यांची महापौरपदी निवड झाल्याबद्दल दिल्लीतील जनतेचे अभिनंदन, असे केजरीवाल म्हणाले.
गंभीर मध्येच निघून गेला...दिल्लीचा खासदार म्हणून गौतम गंभीरला मतदान करण्याचा हक्क होता. गंभीरने महापौर निवडीवेळी मतदान केले. परंतू, उपमहापौर निवडणुकीपूर्वी गंभीर सदनाच्या बाहेर निघून गेला. भाजपाच्या नगरसेवकांनी गंभीर परत सभागृहात येण्यापर्यंत वाट पाहण्याची मागणी केली. परंतू महापौरांनी आधीच खूप उशीर झाल्याचे कारण देत गंभीरची आणखी वाट पाहण्यास नकार दिला.