शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

Delhi MCD Result: दिल्लीतील एका जागेवर AAP-BJPमध्ये झाली 'टाय', आला नवा ट्विस्ट; कोण जिंकलं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 3:30 PM

दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांचे आज निकाल समोर आले आहेत.

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिकेच्या (MCD) निवडणुकांचे आज निकाल समोर आले. यामध्ये एक्झिट पोलप्रमाणे 'आप'नेभाजपाला 15 वर्षांच्या सत्तेतून बेदखल केले आहे. आप बहुमताने सत्तेत आली आहे. असे असले तरी भाजपाने आपला जबरदस्त टक्कर दिली आहे. दिल्ली जिंकली तरी आपला मतांच्या गणितात मार खावा लागला आहे. एवढा की उद्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव देखील पत्करावा लागू शकतो. काँग्रेसबद्दल भाष्य करायचे झाले तर पक्षाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. आम आदमी पार्टीने 134 तर भारतीय जनता पक्षाने 104 जागांवर विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेसने 9 जागा जिंकल्या आहेत. मात्र मलका गंजमधील जागेच्या निकालाने सगळ्यांचेच लक्ष वेधले. 

फेरमतमोजणीत भाजपच्या उमेदवाराने मारली बाजी दरम्यान, दिल्लीतील मलका गंजमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पार्टीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. खरं तर इथे दोन्हीही पक्षातील उमेदवारांना समान मतं मिळाली. प्रथम मोजणीत दोघांनाही 10035, 10035 अशी मते मिळाली. नंतर फेरमतमोजणी झाली, त्यात भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. भाजपकडून रेखा येथे रिंगणात होत्या. दुसरीकडे गुड्डी देवी जाटव या आम आदमी पक्षाकडून उमेदवार होत्या. सुरुवातीपासूनच दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होती. कधी मोजणीत रेखा यांनी आघाडी घेतली तर कधी गुड्डी यांनी विजयाकडे कूच केली. मात्र फेरमतमोजणीत भाजपच्या रेखा 482 मतांनी विजयी झाल्या आहेत. रेखा यांना १३,८५५ तर गुड्डी देवी जाटव यांना १३,३७३ मते मिळाली.

खरं तर 'आप'ला दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत 42 टक्के मते मिळाली आहेत. परंतु, विधानसभेला 53.57 टक्के मते मिळाली होती. म्हणजेच आपने दोन वर्षांत आपने तब्बल 11 टक्के मते गमावली आहेत. आजचा विजय आपला जल्लोष करण्यासाठी पुरेसा असला तरी केजरीवालांना टेन्शन देण्यासाठी देखील पुरून उरणारा आहे.  

'आप'च्या मतात घटनिवडणूक आयोगानुसार आपला दिल्लीत 42.35 टक्के, भाजपाला 39.23 टक्के आणि काँग्रेसला 12.6 टक्के मते मिळाली. अपक्ष उमेदवारांना 2.86 टक्के मते मिळाली. बसपाला 1.65 टक्के मते मिळाली. जर 2020 मध्ये झालेल्या विधानसभेचा विचार केला तर भाजपाने तेव्हा 38.51 टक्के मते आणि काँग्रेसने 4.26 टक्के मते मिळविली होती. दोन्ही निवडणुकांत मतदानाची टक्केवारी जवळपास समानच होती, मग आपची 11 टक्के मते गेली कुठे? भाजपाला 0.72 टक्के मते जास्त मिळाली आहेत. तर काँग्रेसला 7.9 टक्के मते अधिक मिळाली आहेत. 'आप'ने भलेही जागांमध्ये भाजपाला मात दिलेली असली तरी मतांच्या गणितात तोटा झाला आहे. आणखी तीन वर्षांनी ही जादाची मते वाढली तर आपची सत्ता कमी अधिक फरकाने जाण्याची देखील शक्यता नाकारता येणार नाही. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :delhiदिल्लीAAPआपBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेस