शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

दिल्ली मेट्रोचे जाळे झाले ३९२ कि.मी.चे; ढासा बस स्टॅण्ड-नजफगड विभागातील ५० गावे मेट्रोला जोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 2:37 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रे मार्गावर नजफगड ते ढासा बस स्टँड मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रो परिचालनास हिरवा झेंडा दाखवला.

विकास झाडे -

नवी दिल्ली : लोकल प्रवासासाठी दिल्लीकरांना सर्वोत्तम पर्याय म्हणजे दिल्ली मेट्रो आहे. संपूर्ण दिल्ली, एनसीआरमध्ये मेट्रोचे जाळे ३९२ कि.मी. पर्यंत विखुरले आहे. आज ५० गावे जोडल्या गेल्याने मेट्रो स्थानकांची संख्या ही २८६ झाली आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रे मार्गावर नजफगड ते ढासा बस स्टँड मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रो परिचालनास हिरवा झेंडा दाखवला. ग्रे लाइनच्या या कॉरिडॉरवर कामकाज सुरू झाल्यामुळे नजफगड आणि ढासा सीमेच्या आजूबाजूची सुमारे ५० गावे दिल्ली मेट्रो नेटवर्कशी जोडली गेली आहेत.नजफगडच्या शहरी भागात असलेली ग्रे लाइन मेट्रो आता ग्रामीण भागात पोहोचली आहे. नजफगड-ढासा बस स्टॅण्ड मेट्रो कॉरिडॉर सामान्य जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. दिल्ली सीमेवरील हरयाणातील बहादूर शहर-ग्रामीण भागातील लोकांनाही याचा फायदा होईल. नजफगड-ढासा बस स्टॅण्ड मेट्रो कॉरिडॉर सुरू केल्यामुळे ढासा स्टॅण्डच्या आसपासची सुमारे दोन डझन गावे तसेच बहादूरगडच्या लोकांची सोय होईल. ग्रामीण भागातील लोकांसाठी ही आनंदाची बाब असून, आता राजधानी दिल्लीच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी लोकांना अडचणी येणार नाहीत, असे स्थानिकांनी सांगितले.नजफगड-ढासा बस स्टॅण्ड मेट्रो कॉरिडॉर सुरू केल्याने ढासा, मित्रुन, सुरहेरा, खडकाडी, कार, झारोडा कलान, कांगान्हेरीसह इतर अनेक गावांतील लोकांना सुविधा मिळेल. तत्पूर्वी त्यांना मेट्रोसाठी नजफगडला यावे लागले. आता त्यांना थेट द्वारका ते ढासा बस स्टॅण्ड ते वैशाली आणि नोएडापर्यंत ब्लू लाइन मेट्रोने प्रवास करता येणार आहे.नजफगड ते ढासा बस स्टॅण्ड मेट्रो कॉरिडॉर लांबी १.१८ किमी असून, या कॉरिडॉरमध्ये भूमिगत पार्किंगची सुविधा आहे. पार्किंगमध्ये ११० कार आणि १८५ दुचाकी वाहने पार्क केली जाऊ शकतात. या कॉरिडॉरवरील सुरक्षा तपासणी जुलैमध्येच पूर्ण झाली. 

टॅग्स :delhiदिल्लीMetroमेट्रो