नवी दिल्ली : गतिमान एक्सप्रेसच्या यशानंतर आता रेल्वेची ‘रफ्तार’ योजना येत असून त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दिल्ली - हावडा आणि दिल्ली - मुंबई मार्गावर ही रेल्वे ताशी १६० किमी वेगाने धावणार असल्याुळे प्रवास जलद होणार आहे. या योजनेतील रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देशभरात प्रमुख ९००० किमीच्या मार्गावर या रेल्वे धावतील. १६० किमी प्रति तास या वेगाने धावणाऱ्या या रेल्वेंसाठी एक विशेष योजना तयार करण्यात आली आहे. दिल्ली- मुंबई आणि दिल्ली- हावडा या दोन मार्गावर या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. रेल्वेने दिल्ली- आग्रा या मार्गावर नुकतीच गतिमान एक्सप्रेस सुरु केली आहे. या रेल्वेचा वेग ताशी १६० किमीआहे. दिल्ली- हावडा या मार्गावर सध्या प्रतिदिन १२० प्रवासी रेल्वे चालतात. (वृत्तसंस्था)
दिल्ली - मुंबई मार्गावर आता रेल्वेची ‘रफ्तार’
By admin | Published: November 07, 2016 6:21 AM