नवी दिल्ली: कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठा तडाखा दिल्यानंतर तौक्ते चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकले. यामुळे कोकणासह गुजरातमधील अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गेल्या २ ते ३ दिवसांपासून वीज गायब असून, शेकडो झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तौक्ते चक्रीवादळ उत्तर भारताच्या दिशेने पुढे सरकत असून, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशातही यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (delhi north india rajasthan thunderstorm heavy rain imd alert cyclone tauktae)
तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम उत्तर भारतातही दिसून येत असून, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीत पावसाच्या सरी कोसळत असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील काळात याच भागात मुसळधार पाऊसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील अतरौली, जट्टारी, खुर्जा, आग्रा, मुजफ्फरनगर, बिजनौर, मथुरा, बरसाना, नंदगांव आणि राजस्थानमधील कोटपुतली, खैरथल, भिवारी, महानीपुर बालाजी, महानीपूर बालाजी, महावा, नागौर, अलवर, भरतपूर, डीग येथे मुसळधार पाऊस पडू शकतो, असे सांगितले जात आहे.
बिहारमध्ये PM केअर्समधील २५ व्हेंटिलेटर ९ महिनांपासून धूळखात; एकदाही वापर नाही!
चक्रीवादळ राजस्थानपासून ते हरयाणापर्यंत
तौक्ते चक्रीवादळ राजस्थानपासून ते हरयाणापर्यंत जाईल. हवामान विभागाने बुधवारी एनसीआरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला असून, यानुसार ५०- ६० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील आणि पाऊसही पडेल. वादळी वारे उत्तराखंडच्या दिशेने पुढे जातील. पुढच्या दोन दिवसांत हिमाचल प्रदेशातही पाऊस पडेल. वादळामुळे उत्तर भारताच्या काही भागांवरही परिणाम होईल. काही भागांमध्ये पाऊसही पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
चक्रीवादळामुळे ४६ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक फटका
दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाचा ज्या राज्यांना तडाखा बसला, तेथे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे मध्य प्रदेशातील जबलपूर आणि भोपाळमध्ये मुसळधार पाऊस झाला. महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे ४६ लाख ४१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. ३४ लाख १४ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे व राज्यातील इतर जिल्ह्यांतील १० हजार ७५२ गावांतील वीज यंत्रणेचे नुकसान झाले. ६ हजार ४० गावांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.