शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

जैश-ए-मोहम्मदच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 11:19 AM

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला श्रीनगरमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे.

ठळक मुद्देजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला श्रीनगरमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.अब्दुल मजीद बाबा असं दहशतवाद्याचं नाव असून त्याच्यावर तब्बल 2 लाखांचं बक्षिस होतं. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे.

नवी दिल्ली - जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला श्रीनगरमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. अब्दुल मजीद बाबा असं दहशतवाद्याचं नाव असून त्याच्यावर तब्बल 2 लाखांचं बक्षिस होतं. 

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल मजीद बाबा याला श्रीनगरमधून अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. अब्दुल हा जम्मू-काश्मीरच्या मागरेपोरा येथील रहिवासी असून त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते. तो अनेक दिवसांपासून फरार होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला अब्दुलविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्याला ट्रॅक करायला सुरुवात केली. 

2007 मध्ये दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. तेव्हापासून अब्दुल मजीद बाबा हा फरार होता. पोलिसांनी या चकमकीनंतर तिघांना अटक केली होती. 2015 मध्ये उच्च न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच फरार झालेल्या अब्दुल विरोधात उच्च न्यायालयाने वॉरंट जारी केलं होतं. 

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथून काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मदचा वाँटेड दहशतवादी फैय्याज अहमद लोनला अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला जैशच्या दहशतवाद्याला पकडण्यात यश आले होते. दिल्ली पोलिसांनी फैय्याज अहमद लोनवर दोन लाखांचे बक्षीस ठेवले होते. फैय्याज 2015 पासून फरार असून त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. तसेच त्याआधी काही दिवसांपूर्वीच जैश-ए-मोहम्मदचा कमांडर व पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मुदस्सीर अहमदचा साथीदार सज्जाद खानला दिल्लीतून अटक करण्यात आली होती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा पथकं आणि तपास यंत्रणांनी जैश-ए-मोहम्मद विरोधातील आपली मोहिम अधिक तीव्र केली आहे.

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमीसीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (3 मे) चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. तर एक जवान जखमी झाला होता. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू होती. एक जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले. शोपियानमधील चकमकीनंतर परिसरातील मोबाइल इंटरनेट सेवा ही काही काळासाठी बंद करण्यात आली होती. 

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा नेत्याची दहशतवाद्यांकडून हत्या; घरात घुसून झाडल्या गोळ्यादहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गुल मोहम्मद मीर यांची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली होती. तीन दहशतवादी मीर यांच्या नौगाम वोरिनाममधील घरात घुसले होते. त्यांनी मीर यांच्याकडे त्यांच्या गाडीची चावी मागितली आणि गाडी घेऊन जाताना मीर यांच्यावर गोळ्या झाडल्या. परिसरात अटल नावानं ओळखल्या जाणाऱ्या गुल मोहम्मद मीर यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली होती. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी नाकेबंदी करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं. मीर यांच्या हत्येबद्दल भाजपाकडून दु:ख व्यक्त करण्यात आलं. काश्मीर खोऱ्यातली शांतता भंग करणाऱ्यांविरोधात आणि निष्पापांच्या हत्या करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली होती. 

किश्तवाडमध्ये मंगळवारी (9 एप्रिल) दहशतवाद्यांनी रुग्णालयात घुसून फार्मासिस्ट आणि RSS नेत्याची हत्या केली होती. यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानावरही गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गंभीर जखमी असलेल्या आरएसएस नेत्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आरएसएस नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पीएसओ जवान या गोळीबारात शहीद झाला आहे. मंगळवारी दुपारी किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांनी घुसून फार्मासिस्ट व आरएसएस नेते चंद्रकांत शर्मा आणि त्यांचे पीएसओ यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. पीएसओ जवान घटनास्थळीच शहीद झाला.  RSS नेत्याला एअरलिफ्ट करून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज(जीएमसी)मध्ये आणण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. 

 

टॅग्स :terroristदहशतवादीArrestअटकJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस