शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
3
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
4
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
5
"माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
6
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
7
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
8
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
9
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
10
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
11
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
12
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
13
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
14
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
15
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
16
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली
17
ट्रम्प जिंको अथवा हॅरीस...; अमेरिकेच्या राष्ट्रपतीला किती मिळणार सॅलरी? सोबतच या खास सुख-सुविधाही मिळणार
18
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
19
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं

दिल्लीत 11 राज्यांचे ATS प्रमुख, RAW-IB च्या अधिकाऱ्यांची होणार बैठक; दहशतवाद आणि तालिबानवर चर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 8:47 AM

delhi police call meeting of all intelligence agencies and anti terror squad heads : एटीएस प्रमुख, एसओजी आणि 11 राज्यांच्या गुप्तचर संस्थांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर तालिबाने कब्जा केल्यानंतर बिघडलेल्या परिस्थितीदरम्यान भारतातील सर्व गुप्तचर संस्था आणि सर्व राज्यांच्या दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) प्रमुखांची आंतर-समन्वय बैठक शुक्रवारी राजधानी दिल्लीत बोलावण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता बैठक सुरू होईल. एटीएस प्रमुख, एसओजी आणि 11 राज्यांच्या गुप्तचर संस्थांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे उद्दिष्ट एटीएससोबत गुप्तचर संस्थांचे अधिक चांगले समन्वय आणि येत्या काळात लवकरात लवकर गुप्तचर माहिती शेअर करणे असेल, असे सांगण्यात येते.

एटीएस व्यतिरिक्त रॉ, आयबी, एनआयएचे अधिकारी आणि फील्ड ऑपरेशनशी संबंधित अधिकारी या बैठकीत सहभागी होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीवर या बैठकीत चर्चा केली जाईल. यासोबतच भारतातील दहशतवादी कारवायांवर कोणते बदल घडतील, यावरही चर्चा केली जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीमुळे कोणत्याही उत्तम समन्वय आणि इतर घटनांसाठी आधी तयारी करण्यास मदत होईल. पहिल्यांदाच रॉ, आयबी, मिलिटरी इंटेलिजन्स एजन्सी आणि इतर एजन्सीजना दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयात बोलावले गेले आहे, असे सांगितले जात आहे. दरम्यान,   काही दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांना सीमा भागात घुसखोरीची माहिती मिळाली. गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला होता की, दहशतवादी देशात काहीतरी मोठे करण्याचा कट रचत आहेत.

दिल्ली पोलिसांकडून ६ दहशतवाद्यांना अटकदिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी नुकताच उधळून लावला. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ६ दहशतवाद्यांना अटक केली. अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांपैकी एक मुंबईच्या सायन परिसरातील धारावीचा रहिवासी आहे. जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असं या धारावीतील संशयित दहशतवाद्याचं नाव आहे. या सर्वांची दिल्ली पोलीस स्पेशल सेलकडून कसून तपास सुरू आहे आणि यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूल उधळून लावल्यानंतर आता आणखी नवीन खुलासे होत आहेत. 

दिल्ली पोलीस स्पेशल सेलच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांना रेल्वे लाईन आणि ब्रिज उडवण्याचे प्रशिक्षण दिले गेले होते. याचसह गर्दीची ठिकाणंही त्यांच्या टार्गेटवर होती. या प्रकरणात आता स्लीपर सेलची भूमिकाही समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे दहशतवादी पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी गेले होते, परंतु त्यांच्या पासपोर्टवर तसा कोणताच स्टॅम्प नाही. त्यांनी समुद्री मार्गाचा पर्याय निवडला होता. ओमानहून पाकिस्तानाता जातावेळी त्यांनी मध्येच बोटही बदलली होती. हे दहशतवादी १९९३च्या मुंबई बॉम्ब ब्लास्टसारखीच योजना आखण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांची रेकी केल्यानंतर एकत्र यायचे होते.  

टॅग्स :delhiदिल्लीAnti Terrorist Squadएटीएस