शहरं
Join us  
Trending Stories
1
अहो आश्चर्यम! डोंबिवलीत जेव्हा ठाकरे गट अन् शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र येतात...
2
"ते क्रमवारीत पुढे असले तरी..."; बांगलादेशी कॅप्टनचे भारताला चॅलेंज, पाकिस्तानची काढली लाज
3
शिंदेंच्या शिवसेनेच्या शहरप्रमुखाने कापला 'भावी आमदार' लिहिलेला केक, चर्चांना उधाण
4
यवतमाळमध्ये भिंतीवर डोकं आपटून २१ वर्षीय तरुणाचा खून; दोघांना घेतले ताब्यात
5
Mohammad Shami: मोहम्मद शमीचा 'बंगाल क्रिकेट'कडून अपमान? १० महिन्यांनी बोलवून सत्कार, त्यातही केल्या दोन मोठ्या चुका
6
पुन्हा तेच! कोलकात्यातील आणखी एका रुग्णालयात महिलेवर अत्याचार, वॉर्ड बॉय अटकेत...
7
अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Video: शायनिंग मारायला गेला अन् तोंडावर पडला... पाकिस्तानी खेळाडूची भरमैदानात फजिती
9
वैभव चव्हाण बिग बॉस मराठीमधून बाहेर, अरबाजला अश्रू अनावर! ५० दिवसांचा प्रवास संपला
10
'लालू-राबडी मॉडलचे अनुकरण; केजरीवालांना पत्नीला मुख्यमंत्री बनवायचेय', भाजपचा हल्लाबोल
11
बांगलादेशी विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग; प्रवासी रुग्णालयात भरती, प्रकृती स्थिर
12
₹184 चा शेअर ₹6 वर आला, गुंतवणूकदारांना केलं कंगाल; आता देतोय बंपर परतावा, महिनाभरात 80% नं वधारला!
13
मोठी किंमत मोजावी लागेल..!! इस्रायलवर मिसाईल हल्ल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहूंचा इशारा
14
“११ कोटी जनतेचे लाडके नेते उद्धव ठाकरेंकडे पुन्हा राज्याची सूत्रे, मुख्यमंत्री...”: संजय राऊत
15
'राहुल गांधी देशातील नंबर-1 दहशतवादी', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे वादग्रस्त वक्तव्य
16
राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोन दिवसांचा वेळ का घेतला? मंत्री आतिशी यांनी स्पष्टच सांगितलं!
17
"मोदी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख..."; ठाकरेंचा चंद्रचूड यांना टोला
18
“जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे पाप भाजपा सरकारचे, काँग्रेस सत्तेत आल्यास पुन्हा लागू करू”
19
“२२ वर्षे आमदार, ८४ हजार पेन्शन, मोदी घरी बसले असते तर...”: ठाकरे गटाचे नेते थेट बोलले
20
जय श्रीराम! १८० दिवसांत ११ कोटी भक्तांनी घेतले रामललाचे दर्शन; ३३ कोटी पर्यटकांची युपीला भेट

पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ, दिल्ली पोलिसांनी दाखल केला फसवणुकीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 8:08 PM

Pooja Khedkar : याआधी यूपीएससीने पूजा खेडकर विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) केलेल्या तक्रारीनंतर दिल्लीपोलिसांच्या क्राइम ब्रँचने प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी  पूजा खेडकर यांच्याविरोधात फसवणूक आणि दिव्यांगत्वाच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. 

याआधी यूपीएससीने पूजा खेडकर विरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच युपीएससीने पूजा खेडकर यांना नोटीस बजावून कागदपत्रांच्या अनियमिततेबाबत उत्तर मागितले आहे. तुमची उमेदवारी रद्द का करू नये, अशी विचारणा देखील यूपीएससीने पूजा खेडकर यांना केली आहे. तसेच, यूपीएससीने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्याबाबत नोटीस जारी केली आहे. 

यासोबत पूजा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रे निर्माण करून विहित मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा दिली, जे नियमांच्या विरोधात असल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. तसेच खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

दरम्यान, आयएएस अधिकारी बनण्यासाठी पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. कोट्यवधींची संपत्ती नावावर असताना ओबीसी नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटही पूजा खेडकर यांनी काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कार्मिक मंत्रालयाने एक समिती नेमली असून दोन आठवड्यात त्याचा अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

यासोबत पूजा खेडकर यांचे कुटुंबीयही या वादात सापडले आहेत. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी काल अटक केली. त्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले असाता मनोरमा खेडकरांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आली आहे. 

पुणे पोलिसांची दुसरी नोटीस वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी दुसरी नोटीस दिली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात छळवणुकीचा आरोप पूजा खेडकरांनी केला आहे. या आरोपांसदर्भात ही नोटीस देण्यात आली आहे. वाशिम पोलिसांच्या एपीआय श्रीदेवी पाटलांनी वाशिम विश्रामगृहावर जाऊन खेडकरांना नोटीस दिली. पूजा खेडकर यांना याआधी नोटीस देऊनही त्या चौकशीसाठी गैरहजर राहिल्या होत्या. त्यामुळं आज दुसरी नोटीस देण्यात आली आहे.

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसupscकेंद्रीय लोकसेवा आयोगias pooja khedkarपूजा खेडकर