नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात गेल्या ७० दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट करणारी ग्रेटा थनबर्ग अडचणीत सापडली आहे. हवामान बदलांसंदर्भात काम करणाऱ्या ग्रेटाविरोधात दिल्ली पोलिसांत एफआयआर दाखल झाला आहे. शेतकरी आंदोलनावर ग्रेटानं केलेलं ट्विट जगभरात चर्चेचा विषय ठरलं होतं.तेव्हा आपणही निषेध केला होताच ना?; 'त्या' विधानावरून उर्मिला मातोंडकरांचा थेट मोदींवर बाण?पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गनं शेतकरी आंदोलनाचं सनर्थन करणारं ट्विट केलं. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे आम्ही एकजुटीनं उभे आहोत, असं ग्रेटानं ट्विटमध्ये म्हटलं होतं. ग्रेटानं दुसऱ्या एका ट्विटमध्ये एक डॉक्युमेंट शेअर केलं होतं. त्यामध्ये भारत सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्यासाठीची रणनीती नमूद करण्यात आली होती. भारतावर पाच टप्प्यांमध्ये दबाव करण्याचा उल्लेख यामध्ये होता. ग्रेटानं हे ट्विट थोड्या वेळात डिलीट केलं.'Tweet Together'... सायना नेहवालनं अक्षय कुमारचं ट्विट जसंच्या तसं कॉपी केलंजुनं ट्विट डिलीट केल्यानंतर ग्रेटानं एक अपडेटेड टूलकिट शेअर केलं. या नव्या टूलकिटमध्ये अनेक बदल केले होते. २६ जानेवारीला भारतासह परदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची योजना यामधून हटवण्यात आली होती. 'जर तुमची मदत करण्याची इच्छा असेल तर हे अपडेटेड टूलकिट आहे. मागील डॉक्युमेंट मी हटवलं आहे. कारण ते जुनं होतं,' असं ग्रेटानं नव्या टूलकिटसोबतच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.गाझीपूर बॉर्डरवर खिळे काढतानाच्या व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय? पोलिसांनी सांगितलं...भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून निवेदन जारीशेतकरी आंदोलनावर पॉपस्टार रिहाना, पॉर्नस्टार मिया खलिफा, ग्रेटा थनबर्गनं ट्विट केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन प्रसिद्ध केलं. काही व्यक्ती आणि संघटना स्वत:चा अजेंडा रेटण्यासाठी अशा प्रकारची विधानं करत आहेत. कोणत्याही प्रकारची वक्तव्यं करण्याआधी एकदा तथ्यं आणि परिस्थिती समजून घेण्याची गरज आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात नमूद केलं आहे.
Farmer Protest: 'त्या' ट्विटमुळे ग्रेटा थनबर्ग अडचणीत; दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 4:57 PM