शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

हॅलो! नोकरी करायची आहे का?...; होकार देताच हजारो लोकांची झाली फसवणूक, 4 जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 6:17 PM

दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बरेली येथून फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे.

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनीउत्तर प्रदेशातील बरेली येथून फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. बनावट कॉल सेंटरद्वारे हजारहून अधिक लोकांची नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या 4 जणांनी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच आरोपींवर कारवाई करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय प्रांशु, 20 वर्षीय हिमांशू, 27 वर्षीय पंकज पांडे आणि 28 वर्षीय दीपक कुमार अशी 4 आरोपींची नावे आहेत. प्रांशु आणि हिमांशू हे उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत, तर पंकज फरीदाबादचा आणि दीपक बदरपूरचा रहिवासी आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या आरोपांनुसार काही लोकांनी नोकरी देण्याच्या नावाखाली 2,76,072 लाख रुपयांची फसवणूक केली. या तक्रारदाराने नोकरीसाठी अर्ज केला होता आणि कंपनीच्या एचआर विभागात व्यवस्थापक पदासाठी तीन नंबरवरून नोकरीची ऑफर देण्यात आली होती. 

आरोपींच्या बॅंक खात्यातून मिळाली माहितीपोलिसांनी सांगितले की, पैसे भरल्यानंतर संबंधित कंपनीच्या लेटरहेडवर तक्रारदार तरुणीला बनावट नियुक्ती प्रमाणपत्र पाठवण्यात आले. तसेच तपासादरम्यान असेही आढळून आले की, बरेली येथून बनावट कॉल सेंटर चालवले जात आहे. आरोपींच्या बँक खात्याचे डिटेल्स आणि कॉल डिटेल रेकॉर्डवरून असे दिसून आले आहे की त्यांनी अनेक लोकांची फसवणूक केली आहे. 

बरेलीतून आरोपींना अटक पोलीस उपायुक्त चंदन चौधरी यांनी म्हटले, पोलिसांचे एक दल बरेलीतील बसंत विहार येथे गेले आणि तिथे छापा मारून चार आरोपींना पकडण्यात आले. चौकशीतून आरोपींनी विविध कंपन्यांमध्ये नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देऊन हजाराहून अधिक लोकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. 

 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटकjobनोकरी